Punjab Election, Navjot Singh Sidhu: 'गृहिणींना दरमहा २ हजार, तर १२ वी उत्तीर्ण विद्यार्थिनींना २० हजार रुपये देणार', पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धूंनी 'फासा' टाकला!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 06:50 PM2022-01-03T18:50:33+5:302022-01-03T18:51:55+5:30
Punjab Election, Navjot Singh Sidhu: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी नवा 'फासा' टाकला आहे.
Punjab Election, Navjot Singh Sidhu: पंजाब विधानसभा निवडणुकीचे (Punjab Assembly Elections) पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोफत वीज, पाणी आणि नवनवी आश्वासनं दिली जात असताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी नवा 'फासा' टाकला आहे. पंजाबमध्येकाँग्रेसचं सरकार आल्यास राज्यातील गृहिणींना दरमहा २ हजार रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येईल. तसंच दरवर्षाला ८ सिलिंडर सरकारकडून उपलब्ध करुन देण्यात येतील अशी घोषणाच नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली आहे.
मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसकडून राज्यात इयत्ता ५ वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थीनीला ५ हजार रुपये, १० वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थीनीला १० हजार, तर इयत्ता १२ वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थीनीला २० हजार रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय विद्यार्थिनींना पुढे जाऊन शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संगणक आणि टॅबलेट देखील देण्यात येईल, अशी घोषणा नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली आहे.
Rs 2,000 per month will be provided to women who are housewives in Punjab. They will also be provided with 8 gas cylinders per year to keep their kitchen running under all circumstances: Navjot S Sidhu, President Punjab Congress
— ANI (@ANI) January 3, 2022
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानं मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांची मालिका सुरू केली होती. यात मोफत वीज आणि पाण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. त्यावर काँग्रेसनं आता एक पाऊल पुढे टाकत मोठ्या घोषणा केल्या आहेत.
गृहिणींना दरमहा २ हजार रुपये देणार
पंजाबमधील एका प्रचारसभेला संबोधित करताना नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्यातील गृहिणींना अर्थसहाय्य देण्याबाबतची घोषणा केली. राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यास राज्यातील प्रत्येक गृहिणीला दरमहा २ हजार रुपयांची मदत केली जाईल. तसंच वर्षाला ८ सिलिंडर सरकारकडून उपलब्ध करुन दिले जातील, असं आश्वासन दिलं आहे.