Punjab Assembly Election Results 2022: पंजाबमध्ये ‘आप’ची मुसंडी; सत्ताधारी काँग्रेसची धाकधूक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 08:56 AM2022-03-10T08:56:29+5:302022-03-10T08:57:05+5:30

पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२: पंजाब विधानसभा निवडणूक निकालात सत्ताधारी काँग्रेसला मोठा झटका बसताना दिसत आहे.

Punjab Assembly Election Results 2022: In Punjab, AAP is leading while Congress is lagging behind | Punjab Assembly Election Results 2022: पंजाबमध्ये ‘आप’ची मुसंडी; सत्ताधारी काँग्रेसची धाकधूक वाढली

Punjab Assembly Election Results 2022: पंजाबमध्ये ‘आप’ची मुसंडी; सत्ताधारी काँग्रेसची धाकधूक वाढली

Next

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशात सुरुवातीच्या निकालात भाजपा ५० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्षही यूपीत तगडी टक्कर देत असल्याचं दिसून येत आहे. गोवा राज्यातही काँग्रेस-भाजपा यांच्यात जोरदार मुकाबला सुरू आहे.

यातच पंजाब विधानसभा निवडणूक निकालात सत्ताधारी काँग्रेसला मोठा झटका बसताना दिसत आहे. पंजाबमध्ये सुरुवातीच्या निकालात एकूण ११७ जागांपैकी २३ हून अधिक जागांवर अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आघाडीवर आहे. तर सत्ताधारी काँग्रेस १८ जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्ये अकाली दल ६ जागांवर तर भाजपा २ जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्ये काँग्रेस सत्ता टिकवण्यासाठी धडपड करताना पाहायला मिळत आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’च्या झाडूची कमाल दिसून येत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष विजयाच्या दिशेने घौडदौड करत असून आप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत आहे.

सुरुवातीच्या निकालानुसार

मुख्यमंत्री चरणजीत चन्नी भदौड जागेवरून पिछाडीवर आहेत.

अमृतसर पूर्व येथून नवज्योत सिद्धु आघाडीवर आहेत

एक्झिट पोलनुसार केजरीवालांच्या 'झाडू'नं काँग्रेसची साफसफाई

पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण ११७ जागा आहेत. यापैकी ७६ ते ९० जागांवर आम आदमी पक्षाला यश मिळेल, असं सर्व्हेमध्ये सांगण्या आलं होतं. तर गेल्या निवडणुकीत ७७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची वाताहत होताना दिसत होती. काँग्रेसला १९ ते ३१ जागा मिळतील असा अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपसोबतची युती तोडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाला ७ ते ११ जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाबमध्ये आपला ४१ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे दिल्लीनंतर पंजाबमध्ये आपचं सरकार येईल. गेल्या निवडणुकीत आपनं २० जागा जिंकल्या होत्या. या जागा आता चौपट होताना दिसत आहेत. पंजाबमध्ये आपला २८ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे. भाजपला ७ टक्के मतं मिळू शकतात.

Web Title: Punjab Assembly Election Results 2022: In Punjab, AAP is leading while Congress is lagging behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.