पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने (AAP) मोठा विजय मिळवला आहे. जेव्हा एकीकडे पंजाब निवडणुकीचे सुरुवातीचे निकाल आपच्या बाजूने यायला सुरुवात झाली, तेव्हा दुसरीकडे ट्विटर आणि फेसबुकवर युक्रेनचे राष्ट्रपती Volodymyr Zelenskyy ट्रेंड व्हायलाही सुरुवात झाली. खरे तर, सोशल मीडिया यूजर्सनी आम आदमी पार्टीचे सीएम फेस असलेल्या भगवंत मान यांची तुलना Volodymyr Zelenskyy यांच्यासोबत करायला सुरुवात केली. कारण झेलेन्स्कीदेखील कधी काळी भगवंत मान यांच्याप्रमाणेच कॉमेडियन होते.
झेलेन्स्की हे युक्रेनमधील प्रसिद्ध कॉमेडी शो KVN मध्ये परफॉरमन्स करत होते. ते 2003 पर्यंत या शोमध्ये होते. टेलीव्हिजन शिवाय झेलेन्स्की यांनी Rzhevskiy Versus Napoleon (2012) आणि रोमँटिक कॉमेडी फिल्म 8 First Dates (2012) आणि 8 New Dates (2015) मध्येही काम केले आहे.
तर, भगवंत मान यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, राजकारणात येण्यापूर्वी, त्यांनी नॅशनल टेलीव्हिजनसह अनेक पंजाबी कॉमेडी शोमध्ये काम केले आहे. त्यांचा जुगनू मस्त मस्त हा शो प्रचंड प्रसिद्ध झाला होता.
भगवंत मान आणि झेलेन्स्की यांची तुलना करणारे आणखी काही खास ट्विट -