चंडिगड - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. येथे हरियाणातील एका शेतकऱ्याने 51 लाख रुपयांची म्हैस विकून लंगर दिल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र, यासंदर्भात पंजाबच्या कस्बा माछीवाडा येथील एका पशू पालक शेतकऱ्याने हैराण करणारा खुलासा केला आहे. पवित्र सिंग असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
पवित्र सिंग यांनी सांगितले, की त्यांनी मोहरा जातीची सरस्वती म्हैस 51 लाखात विकत घेतली नाही. तर त्याने 7 म्हशींसह अडीच लाख रुपये रोख दिले होते. हा व्यवहार हरियाणातील व्यापारी सुखबीर टांडा यांच्यासोबत झाला होता. ही म्हैस एका वेळेला तब्बल 33 लिटर दूध देते.
पवित्र सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे, की हरियाणाचे व्यापारी सुखबीर टांडा यांनी 51 लाखांत मोहरा जातीची म्हैस सरस्वती विकून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात लंगर लावले आहे. यातील सत्य असे, की सुखबीर टांडा यांनी शेतकरी आंदोलनता लंगर नक्कीच लावले आहे. मात्र, हे लंगर त्यांनी लोकांच्या सहकार्याने लावले आहे. यात मीही सेवा देऊन आलो आहे.
पवित्र सिंग म्हणाले, त्यांनी सरस्वती म्हैस फेब्रुवारी महिन्यात विकत घेतली होती. आता मी दिलेल्या 7 म्हैस सुखबीर टांडा यांनी 51 लाख रुपयांना विकल्या, की यापैकी कमी किमतीत यासंदर्भात मला माहिती नाही.