अमृतसर: पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील संगरूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे सिमरनजीत मान यांनी मोठा विजय मिळवत आप उमेदवाराचा पराभव केला. आपचे नेते भगवंत मान राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणूक झाली.
कोण आहेत सिमरजनीत मान?सिमरनजीत सिंह मान (77) हे शिरोमणी अकाली दल (अमृतसर) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 1966 मध्ये केंद्रीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. यानंतर 18 जून 1984 रोजी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला. त्यांचे लग्न गीतंदर कौर मान (पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रनीत कौर यांची बहीण) यांच्याशी झाले आहे. ते 1989 मध्ये तरणतारणमधून आणि त्यानंतर 1999 मध्ये संगरूरमधून खासदार झाले होते.