पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देशातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत राहुल गांधींच्याशिक्षणापर्यंत जाऊन पोहोचले. मान म्हणाले, "अमेरिकेत खासगी शाळा असो वा सरकारी शाळा असो, दोन्ही ठिकाणी सारखेच शिक्षण मिळते. एकसारखेच शिक्षक असतात. मात्र आपल्याकडे, गरीबांचे शिक्षक वेगळे आहेत, श्रीमंतांचे शिक्षक वेगळे आहेत. राहुल गांधींचे जे शिक्षक आहेत, मनप्रीत बादल यांचे जे शिक्षक आहेत, सुखबीर बादल यांचे जे शिक्षक आहेत, पहिली गोष्ट तर, या धरतीवर शिकलेच नाही. या सर्वांनी डोंगरात शिक्षण घेतले. दून शाळा डोंगरात आहे. सुखबीर बादल यांनी सनावर येथे शिक्षण घेतले. तर समजून घ्या, आमचे शिक्षक वेगळे आहेत आणि त्यांचे शिक्षक वेगळे आहेत.
भगवंत मान म्हणाले, अम्हा गरीबांचा अभ्यासक्रम वेगळा आणि त्या श्रीमंतांचा अभ्यासक्रम वेगळा आहे. माझ्या गावातील तीन मुलांना घेऊन जा. राहुल गांधी आणि सुखबीर बादल ज्या शाळेत शिकले, त्याच शाळांमध्ये त्यांना प्रवेश द्या. फी माफ करा आणि दोन वर्षांनी निकाल बघा. आमच्या गावातील मुले पहिले असतील. पण काय करणार, या मुलांना संधीच मिळत नाही. कॉन्हेंटेरियन आहेत आणि आम्ही सरकारियन आहोत. सरकारी शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासही होतो आणि निर्णय घेणेही शिकवलेजाते. राजकीय निर्णय कसे घ्यायचे हे शिकवले जाते. मान न्यूज18 इंडियासोबत बोलत होते.
मुख्यमंत्री मान म्हणाले, देशात 'वन नेशन वन इलेक्शन'ची चर्चा सुरू आहे. मग, ‘वन नेशन वन एज्यूकेशन’ची चर्चा का होऊ नये? मी अमेरिकेतील शिक्षण व्यवस्था बघितली आहे. वाचली आहे. तेथे तुमची मरजी आहे. सरकारी शाळा आहेत, खाजगी शाळा आहेत. हवे तेते शिका. मात्र, शिक्षण, शिक्षक आणि अभ्यासक्रम एकच असेल. येते गरीब मुलांना एक शिक्षक असतो आणि श्रीमंत मुलांना दुसरा शिक्षक असतो. हे बदलायला हवे. श्रीमंत मुलांना वास्तविकतेचे ज्ञान नसते.