Navjot Singh Sidhu Resign: पंजाब गमावले! नवज्योत सिंग सिद्धूंचा एका ओळीत राजीनामा; सोनिया गांधींचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 10:26 AM2022-03-16T10:26:34+5:302022-03-16T10:27:37+5:30
Navjot Singh Sidhu Resign: पंजाबमध्ये काँग्रेसला हातची सत्ता गमवावी लागली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना सिद्धू यांच्यामुळे मुख्यमंत्री पदाची खूर्ची सोडावी लागली होती. गेल्या वर्षभरापासून पंजाबमध्ये सिद्धू यांनी काँग्रेस खिळखिळी करण्याचे काम केले, असा आरोप अमरिंदर यांनी लावला होता.
मिनी लोकसभा म्हटल्या जाणाऱ्या पाच राज्यांमध्ये काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्याने पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी तेथील पक्ष प्रमुखांचे राजीनामे मागितले होते. यामुळे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंनी एका ओळीमध्ये राजीनामा लिहून तो काँग्रेस हायकमांडकडे सोपविला आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या एका ओळीच्या राजीनाम्यात सिद्धू यांनी लिहिले की, ''दि प्रेसिडेंट, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.''
Punjab Congress chief Navjot Singh Sidhu tenders his resignation from the post.
— ANI (@ANI) March 16, 2022
Congress President Sonia Gandhi had asked the PCC Presidents of Uttar Pradesh, Uttarakhand, Punjab, Goa & Manipur to put in their resignations in order to facilitate reorganisation of PCCs. pic.twitter.com/3CXOjph7Sy
पंजाबमध्ये काँग्रेसला हातची सत्ता गमवावी लागली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना सिद्धू यांच्यामुळे मुख्यमंत्री पदाची खूर्ची सोडावी लागली होती. गेल्या वर्षभरापासून पंजाबमध्ये सिद्धू यांनी काँग्रेस खिळखिळी करण्याचे काम केले, असा आरोप अमरिंदर यांनी लावला होता. पराभवानंतरही कॅप्टननी त्यास सिद्धू यांनचा जबाबदार धरले होते. कॅप्टन यांच्या स्वतंत्र पक्षालाही पराभवाचा सामना करावा लागला होता.
अशा परिस्थितीत सिद्धू यांच्या राजीनाम्याचि मागणी पंजाबच्या काँग्रेस नेत्यांमधून होत होती. पंजाबमध्ये आपने मोठी मुसंडी मारत एकहाती सत्ता काबीज केली आहे. आज भगवंत मान हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.