मिनी लोकसभा म्हटल्या जाणाऱ्या पाच राज्यांमध्ये काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्याने पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी तेथील पक्ष प्रमुखांचे राजीनामे मागितले होते. यामुळे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंनी एका ओळीमध्ये राजीनामा लिहून तो काँग्रेस हायकमांडकडे सोपविला आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या एका ओळीच्या राजीनाम्यात सिद्धू यांनी लिहिले की, ''दि प्रेसिडेंट, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.''
अशा परिस्थितीत सिद्धू यांच्या राजीनाम्याचि मागणी पंजाबच्या काँग्रेस नेत्यांमधून होत होती. पंजाबमध्ये आपने मोठी मुसंडी मारत एकहाती सत्ता काबीज केली आहे. आज भगवंत मान हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.