नवी दिल्ली:पंजाबकाँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. चंदीगडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिद्धू असे काही बोलले की, ज्यावरुन वाद निर्माण होऊ शकतो. राज्य सरकारच्या लेबर कार्ड वितरणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला सिद्धू उत्तर देत होते. यावेळी त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी 'तो' अपशब्द वापरले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सिद्धूंवर जोरदार टीका होत आहे.
नवज्योतसिंग सिद्धू पत्रकारांशी पंजाब मॉडेलबद्दल बोलत होते. राज्यात काँग्रेस पुन्हा आल्यास शहरी भागातील कामगारांना रोजगाराची हमी दिली जाईल, असे ते म्हणाले. मनरेगाच्या मॉडेलवर शहरांमध्येही रोजगाराची व्यवस्था केली जाईल. याअंतर्गत कुशल आणि अकुशल मजुरांना समान रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. यादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना सिद्धूची जीभ घसरली आणि त्यांच्या तोंडातून शिवी निघाली. यानंतर सिद्धू हसताना दिसले.
मजुरांसाठी कल्याणकारी योजना तयार केल्या जातील
नवज्योतसिंग सिद्धूंनी यावेळी सरकारच्या योजना सांगितल्या. गेल्या 25 वर्षांपासून आम्ही श्रीमंतांचा उल्लेख करत आहोत, मात्र यादरम्यान मजुरांचा उल्लेख कोणीही केला नाही. त्यांचा आता पंजाब मॉडेल अंतर्गत उल्लेख केला जाईल. कामगारांसाठी कल्याणकारी योजना तयार केल्या जातील, असे ते म्हणाले.