CoronaVirus : पंजाबमध्ये काँग्रेस आमदारासह कुटुंबातील 11 जणांना कोरोनाची लागण, लग्नात सहभागी झालेले 9 नातलगही पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 09:52 PM2021-02-20T21:52:26+5:302021-02-20T21:57:09+5:30
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आमदार सुनील दत्ती यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम (Wedding Ceremony) होता. यावेळी कुण्या तरी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हे सर्व जण संक्रमित झाले आहेत.
अमृतसर -पंजाबमधील अमृतसरमध्ये काँग्रेसआमदार सुनील दत्ती (Sunil Datti) आणि त्यांच्या कुटुंबातील 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुनील दत्ती हे अमृतसर नॉर्थचे आमदार आहेत. यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या घराला मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित केले आहे. (Congress MLA Sunil Datti and his 10 family members tested corona positive)
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आमदार सुनील दत्ती यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. यावेळी कुण्या तरी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हे सर्व जण संक्रमित झाले आहेत. अमृतसरचे सिव्हिल सर्जन डॉक्टर चरणजीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार सुनील दत्ती यांच्या घरातील एकूण 11 जण कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. तसेच त्यांच्या व्यतिरिक्त आणखी नऊ नातलगांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आमदार दत्ती यांच्या घरातील सर्व कोरोनाबाधित लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. याशिवाय प्रशासनाने काँग्रेस आमदारांकडून लग्नात भेट झालेल्या लोकांची यादी मागवली आहे. रविवारी या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येईल.
भारतात संक्रमितांचा आकडा 1 कोटी 10 लाखच्या जवळ -
भारतात कोरोना संक्रमितांचा आकडा 1 कोटी 9 लाख 77 हजार 387 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 13,993 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 10 हजार 307 रुग्म बरे झाले आहेत. तसेच 101 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील एकूण अॅक्ट्व्ह रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार 127 आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 56 हजार 212 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 1 कोटी 6 लाख 78 हजार 48 जण बरे झाले आहेत.
मोठी बातमी! ...तर राज्यात पुन्हा लॉकडाउन, ठाकरे सरकारमधील मंत्र्याचे स्पष्ट संकेत
देशातील काही राज्यांत पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा वेगाने फैलाव व्हायला सुरुवात झाली आहे. यात केरल, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगज आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे. या राज्यांत नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.