शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

CoronaVirus : पंजाबमध्ये काँग्रेस आमदारासह कुटुंबातील 11 जणांना कोरोनाची लागण, लग्नात सहभागी झालेले 9 नातलगही पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 9:52 PM

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आमदार सुनील दत्ती यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम (Wedding Ceremony) होता. यावेळी कुण्या तरी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हे सर्व जण संक्रमित झाले आहेत.

अमृतसर -पंजाबमधील अमृतसरमध्ये काँग्रेसआमदार सुनील दत्ती (Sunil Datti) आणि त्यांच्या कुटुंबातील 10 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुनील दत्ती हे अमृतसर नॉर्थचे आमदार आहेत. यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या घराला मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित केले आहे. (Congress MLA Sunil Datti and his 10 family members tested corona positive)

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आमदार सुनील दत्ती यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. यावेळी कुण्या तरी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हे सर्व जण संक्रमित झाले आहेत. अमृतसरचे सिव्हिल सर्जन डॉक्टर चरणजीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार सुनील दत्ती यांच्या घरातील एकूण 11 जण कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. तसेच त्यांच्या व्यतिरिक्त आणखी नऊ नातलगांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 

CoronaVirus : चिंता वाढली! मुंबईत पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका, 71,838 कुटुंब असलेल्या 1305 इमारती सील!

आमदार दत्ती यांच्या घरातील सर्व कोरोनाबाधित लोकांना  क्वारंटाइन करण्यात आले आहे. याशिवाय प्रशासनाने काँग्रेस आमदारांकडून लग्नात भेट झालेल्या लोकांची यादी मागवली आहे. रविवारी या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येईल.

भारतात संक्रमितांचा आकडा 1 कोटी 10 लाखच्या जवळ -भारतात कोरोना संक्रमितांचा आकडा 1 कोटी 9 लाख 77 हजार 387 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 13,993 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 10 हजार 307 रुग्म बरे झाले आहेत. तसेच 101 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील एकूण अॅक्ट्व्ह रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार 127 आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 56 हजार 212 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 1 कोटी 6 लाख 78 हजार 48 जण बरे झाले आहेत. 

मोठी बातमी! ...तर राज्यात पुन्हा लॉकडाउन, ठाकरे सरकारमधील मंत्र्याचे स्पष्ट संकेत

देशातील काही राज्यांत पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा वेगाने फैलाव व्हायला सुरुवात झाली आहे. यात केरल, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगज आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे. या राज्यांत नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसMLAआमदारcorona virusकोरोना वायरस बातम्या