नवी दिल्ली - पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala Murder Case) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर आता आणखी एका काँग्रेस खासदारालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.सिद्धू मुसेवाला सारखेच तुमचे हाल केले जातील" अशा आशयाचा मेसेज Whatsapp वर आला आहे. तसेच पुढचा नंबर तुमचा असं म्हणत थेट धमकी दिली आहे. पंजाबच्या लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंग बिट्टू (Congress Ravneet Singh Bittu) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे.
"सिद्धू मुसेवाला सारखेच तुमचे हाल केले जातील" असं मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे. रवनीत सिंग बिट्टू यांनी धमकी मिळाल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर बिट्टू यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 9.30 वाजता रवनीत यांच्या पर्सनल नंबरवर एक Whatsapp कॉल आला ज्यामध्ये त्यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सध्या बिट्टू हे देशाबाहेर आहेत. त्यांना याआधी देखील धमक्या मिळाल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, रवनीत सिंग बिट्टू यांनी एका विदेशी नंबरवरून कॉल आला. यामध्ये आता पुढचा नंबर तुझा आहे असं म्हणत धमकी दिली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने ग्रुप कॉल केला होता. ज्यामध्ये हिंदू नेता संदीप गोरा थापर, मानसाचे शेतकरी नेते रुल्दू सिंह मानसा आणि रवनीत सिंग बिट्टू यांचा समावेश होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. मुसेवाला हत्येचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसं नवनवीन पुरावे समोर येत आहेत. हत्येत वापरण्यात आलेल्या अल्टो कारचे नवीन सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. घटनेच्या जवळपास 9 तासांनंतर, शूटर्स मोगा येथे अल्टो कारमध्ये पेट्रोल भरताना दिसले. त्यावेळी महामार्गावर कार सोडून ते पळून गेले होते.
सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील नवा Video आला समोर, कारमध्ये दिसले शूटर्स, गूढ उलगडणार
सिद्धू मुसेवाला हत्याकांडात वापरण्यात आलेल्या अल्टो कारचे नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर अनेक खुलासे होण्याची अपेक्षा आहे. हे सीसीटीव्ही फुटेज मुसेवालाच्या हत्येनंतरच्या 9 तासांचे आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसते की, मानसापासून सुमारे 100 किमी अंतरावर एक अल्टो कार मोगाच्या पेट्रोल पंपावर सुमारे 3 वाजून 15 मिनिट 29 सेकंदांनी उभी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावर जी कार उभी आहे तीच कार आहे ज्यातून गोळीबार करणारे पळून गेले होते. कारच्या पुढच्या सीटवर दोन लोक बसलेले दिसतात. ड्रायव्हिंग सीटवर बसलेला शूटर पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला हाताच्या इशाऱ्याने बोलवतो आणि पेट्रोल भरण्यासाठी पैसे देतो.