'...तर राजकारण सोडून देईन', पंजाबच्या राजकीय आखाड्यात नवज्योत सिंग सिद्धूंची मोठी घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 10:49 PM2022-01-02T22:49:35+5:302022-01-02T22:52:05+5:30

भाजपवर निशाणा साधताना सिद्धू म्हणाले, भारतीय जनता पक्षाने 5 वर्षात जालंधरमध्ये कार्यालय उघडले नाही, कारण शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल, हे त्यांच्या नेत्यांना माहीत होते. भाजप ईडीचा धाक दाखवून इतर पक्षांच्या नेत्यांना आपल्या छावणीत सामील करून घेत आहेत, असेही सुद्धू म्हणाले.

Punjab congress Navjot Singh Sidhu said if 5 lakh people do not get employment i will leave politics | '...तर राजकारण सोडून देईन', पंजाबच्या राजकीय आखाड्यात नवज्योत सिंग सिद्धूंची मोठी घोषणा!

'...तर राजकारण सोडून देईन', पंजाबच्या राजकीय आखाड्यात नवज्योत सिंग सिद्धूंची मोठी घोषणा!

Next

राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यास 5 लाख गरीबांना रोजगार दिला जाईल आणि तसे झाले नाही, तर राजकारण सोडून देईन, असे आश्वासन पंजाबकाँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी एका निवडणूक सभेत दिले आहे. फगवाडा येथे काँग्रेस आमदार बलविंदर सिंग धालीवाल यांच्या समर्थनार्थ रविवारी आयोजित एका मोठ्या रॅलीत सिद्धू यांनी ही घोषणा केली. एवढेच नाही, तर त्यांनी पंजाबमधील माफिया राज पूर्णपणे संपुष्टात आणण्यासंदर्भातही भाष्य केले.

भाजपवर निशाणा साधताना सिद्धू म्हणाले, भारतीय जनता पक्षाने 5 वर्षात जालंधरमध्ये कार्यालय उघडले नाही, कारण शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल, हे त्यांच्या नेत्यांना माहीत होते. भाजप ईडीचा धाक दाखवून इतर पक्षांच्या नेत्यांना आपल्या छावणीत सामील करून घेत आहेत, असेही सुद्धू म्हणाले.

सुखबीर सिंग बादल यांच्यावरही निशाणा - 
नवज्योतसिंग सिद्धू यांनीही शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. यावेळी लोकांना आठवण करून देत सिद्धू यांनी प्रश्न केले, की माता चंद कौर यांची हत्या कुणी करवली? अकाली दलाच्या युथ विंगने आपल्या मुलीसह आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या करत घोषणाबाजी कुणी केली. जालंधरमध्ये जनमेजाजी यांची हत्या कुणी केली?
 
Web Title: Punjab congress Navjot Singh Sidhu said if 5 lakh people do not get employment i will leave politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.