नवी दिल्ली : सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने (AAP) पंजाबमध्ये मुसंडी मारली असून जवळपास 64 जागांवर आघाडी घेतली आहे. मात्र, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या निवणडुकीच्या रिंगणात अशी अनेक मोठी नावे आहेत, जी अजूनही पिछाडीवर आहेत. परंतू, हा अद्याप एक सुरुवातीचा कल आहे. नंतर परिस्थितीत बदल होऊ शकतो. भगवंत मान, अमरिंदर सिंग, सुखपाल खैरा अशी मोठी उमेदवारांची नावे अद्याप पिछाडीवर आहेत. पंजाबमधील लांबी मतदारसंघातून प्रकाशसिंग बादलही मागे आहेत. काँग्रेसचे बंडखोर आणि मंत्री राणा गुरजीत यांचा मुलगा सुलतानपूर लोधीमधून 6200 मतांनी आघाडीवर आहे. काँग्रेसचे आमदार नवतेज चीमा चौथ्या क्रमांकावर आहेत.
प्रकाशसिंग बादल पिछाडीवर आहेत. प्रकाशसिंग बादल यांनी पाच वेळा पंजाबचे नेतृत्व केले आहे. ते भारतातील पंजाब प्रांताचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल (बादल) चे प्रमुख आहेत. दुसरीकडे पटियाला मतदारसंघातून कॅप्टन अमरिंदर सिंग मागे आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पार्टीने हाफ सेंच्युरी ओलांडली आहे. काँग्रेसही टक्कर देत असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर शिरोमणी अकाली दल तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आम आदमी पार्टी काय म्हणते?दिवसही मोठा आहे कारण प्रकाशसिंग बादल लांबीमधून पिछाडीवर आहेत. आपल्या सामान्य माणसांचा पराभव होत आहे. नवज्योतसिंग सिद्धू पराभूत होत आहेत. म्हणूनच आजचा दिवस चर्चेचा आहे असे मला वाटते. पंजाब आता भगवंत मान चालवतील आणि आम आदमी पार्टीचे लोक चालवतील, असे आम आदमी पार्टीचे नेते संजीव झा म्हणाले. तर भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, आम्ही अर्ध्या जागेवर लढलो, त्यामुळे हे होत आहे. आम्ही सर्व जागांवर लढलो असतो तर काहीतरी वेगळे झाले असते.
याचबरोबर, दुसरीकडे आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा म्हणाले- "आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की आम आदमी पार्टी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल. पंजाबच्या लोकांनी भगवंत मान आणि केजरीवाल यांच्या जोडीला सामावून घेतले आहे. पंजाबचे राजकारण सिंहासनावर आहे. भारतातील मोठमोठे लोक हादरले आहेत, त्यांच्याच जागांची अवस्थाही वाईट आहे."