Punjab Election 2022 : काँग्रेसलाही Pushpa फिवर; 'चन्नी झुकेगा नही...' ED च्या छाप्यावर केलं ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 09:58 PM2022-02-04T21:58:17+5:302022-02-04T21:59:11+5:30
Punjab Election 2022 : पंजाब निवडणुकीत काँग्रेसनं मुख्यमंत्री चन्नी यांना प्रमोट करण्यासाठी पुष्पा चित्रपटातील एखा डायलॉगची मदत घेतलीये.
पंजाब निवडणुकीतही (Punjab Election 2022) 'पुष्पा' चित्रपटाच्या डायलॉग्सचा वापर होताना दिसत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नातेवाईकाच्या घरावर जेव्हापासून ईडीनं छापा टाकला तेव्हापासून राजकीय वाद निर्माण झाला आहे. आतापर्यंत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत होत्या, परंतु आता काँग्रेसनं एक पाऊल पुढे टाकत पुष्पा चित्रपटातील डायलॉगचा वापर केलाय.
युथ काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री चन्नी यांचा फोटोही शेअर केलाय. "ईडीचा छापा टाका किंवा खोटे आरोप करा, चन्नी झुकणार नाही. हे पंजाबचे सिंह आहेत," असं त्यात लिहिण्यात आलं आहे. पंजाब युथ काँग्रेसनं शेअर केलेला हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
ED की रेड मारो या झूठे आरोप लगाओ, हम झुकेंगे नही! pic.twitter.com/HYRH9wwMYN
— Punjab Youth Congress (@IYCPunjab) February 4, 2022
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या नातेवाईकाच्या घरावर ईडीने धाड टाकली होती. या कारवाईत ईडीने भूपेंदर सिंग हनी आणि भूपेंदर यांच्या जवळचे संदीप कपूर यांच्या घरामधून अनुक्रमे ६ आणि २ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या कारवाईत ईडीने संपत्तीशी संबंधित काही कागदपत्रेदेखील जप्त केली होती. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असताना मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकावर ईडीने कारवाई केल्याने सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली होती.