शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

Punjab Election 2022: काँग्रेसच्या खासदार भाजपच्या कार्यक्रमात; म्हणाल्या, माझ्यासाठी कुटुंब आधी, मग... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 6:54 AM

अमरिंदर यांच्या विजयासाठी पत्नी परनीत यांची धडपड तर अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकार दिल्लीतून भाजप चालवित होते, म्हणून ते बदलावे लागले, असा दावा काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी येथे केला.

बलवंत तक्षकचंदीगड : पंजाबच्या पटियालातील काँग्रेसच्या खासदार परनीत कौर या शिस्तभंगाच्या कारवाईची पर्वा न करता भाजपाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. त्या म्हणाल्या की, माझ्यासाठी कुटुंब अगोदर आहे आणि पती कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी मते मागण्यासाठी मी आले आहे. काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर अमरिंदर सिंग हे पटियाला शहरी विधानसभा मतदारसंघातून पंजाब लोक काँग्रेस या आपल्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. त्यांनी भाजपसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी खासदार परनीत कौर या भाजपाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. 

भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत परनीत कौर यांनी लोकांना हात जोडून विनंती केली की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना विजयी करा. यापूर्वी अमरिंदर सिंग यांच्या समर्थनार्थ केलेल्या एका विधानावरून परनीत कौर यांना पंजाबचे प्रभारी हरीश चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. त्यांनी अद्याप या नोटिसीला उत्तर दिलेले नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की, नोटीस पक्षाच्या सरचिटणीसांकडून यायला हवी. 

भाजप दिल्लीतून सरकार चालवीत होते म्हणून अमरिंदर यांना हटविले -प्रियांका गांधी

अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकार दिल्लीतून भाजप चालवित होते, म्हणून ते बदलावे लागले, असा दावा काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी रविवारी येथे केला. कोटकपुरा येथे जाहीर सभेत त्या बोलत होत्या.  आम आदमी पार्टी प्रचार करीत असलेल्या शासनाच्या ‘दिल्ली मॉडेल’पासून लोकांनी सावध राहण्याचे आवाहन करतांना त्या म्हणाल्या की, २०१४ मध्ये गुजरात मॉडेलचा प्रचार करून भाजप केंद्रात सत्तेत आली होती.

अमरिंदर सिंग यांंना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख न करता त्या म्हणाल्या की, आमचे पाच वर्षे येथे सरकार होते, हे खरे आहे. सरकारमध्ये काही उणीवा होत्या, हेही खरे आहे. हे सरकार आपल्या मार्गावरून भरकटले होते. दिल्लीतून काँग्रेसकडून नव्हेतर भाजप आणि भाजपप्रणीत सरकारमार्फत चालविले जात होते. हे लागेबांधे उघड झाले. त्यामुळे आम्हाला सरकार बदलावे लागले.

आम्ही तुमचे म्हणणे ऐकत होते. काही तरी चुकीचे होते, याची जाणीव होत होती; परंतु,  आम्ही सर्व काही व्यवस्थित केले आणि पंजाबच्या जनतेला चन्नी यांच्यासारखी व्यक्ती मिळाली.  गरीब कुटुंबातून आलेले ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शंभर-दीडशे दिवसांत खूप काम केले.  पंजाब सरकार पंजाबमधून चालविले पाहिजे.  केजरीवाल यांच्या इशाऱ्यावर दिल्लीतून सरकार चालविण्याचा आम आदमी पार्टीचा बेत आहे, म्हणून या पक्षाला पाठिंबा देण्याची मागची चूक पुन्हा करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. नवा विचार, नवा पंजाब जाहीर सभेत बोलताना त्यांनी आश्वासन दिले की, चन्नी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आल्यास  गरजू कुटुंबांना दरवर्षी ८ मोफत सिलिंडर मिळतील आणि या कुटुंबातील महिलांनाही दरमहा ११०० रुपये मिळतील. सरकारी इस्पितळात २० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील. राज्य रोजगार हमी योजनेनुसार दरवर्षी १०० दिवस रोजगाराची हमी असेल.

टॅग्स :Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२