चंदीगड: पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब (Punjab Election 2022) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. पंजाबमधील पक्षांनी हळूहळू मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून, या निवडणुकीत नवीन समीकरणे पाहायला मिळू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पंजाबचे माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू (navjot singh sidhu) राजकारणात पुन्हा सक्रीय झाले असून, ते नवा पक्ष काढण्याच्या तयारीत असल्याच्या शक्यतांची चर्चा सुरू आहे. (navjot singh sidhu again politically active and might be establish new party)
पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये पंजाब विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर इतके दिवस गायब असलेले नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा राजकारण सक्रीय होताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. आता ते उघडपणे अमरिंदर सिंग सरकारविरोधात टीका करताना दिसत आहेत. अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमात कोटकपुरा आणि बहिबल येथे झालेल्या गोळीबार कांडाचा रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी केली होती.
“पंतप्रधान मोदी प्रचारात मस्त आणि देशातील जनता कोरोनाने त्रस्त”
अमरिंदर सिंग सरकारचा नाकर्तेपणा उघड करणार
नवज्योत सिंग सिद्धू यांनी अमरिंदर सरकारविरोधात शड्डू ठोकण्याचा विचार पक्का केला असून, ते आता सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघड करण्यास सुरुवात करतायत, असे सांगितले जात आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आडून आडून नाव न घेता सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर टीका केल्याचेही सांगितले जात आहे.
नवीन पक्ष स्थापन करणार?
पटियाला येथे एका रॅलीत सहभागी होताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे किंवा त्यापासून दूर होण्याचे मन बनवले असून, ते नवीन पक्ष स्थापन करतील, असे स्पष्ट संकेत दिल्याचेही बोलले जात आहे. आगामी काही महिन्यात ते नवीन पक्षाच्या स्थापनेविषयी घोषणा करू शकतात, असेही सांगितले जात आहे.
भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण; पवारांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं
शिरोमणी अकाली दलाचा पाठिंबा!
नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबसह केंद्रातील मोदी सरकारवरही टीका करण्यास सुरुवात केली असून, शिरोमणी अकाली दल (डेमोक्रेटिक) सिद्धू यांना पाठिंबा देण्यासंदर्भात रणनीति आखत असल्याचे समजते. याच पक्षाच्या नेत्यांनी सिद्धू यांना नवीन पक्ष काढण्यासाठी प्रोत्साहन दिले असून, छोटे पक्ष त्यांना साथ देतील, असे आश्वासनही देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.