Punjab Election 2022: सिद्धूंचे अतीलाड महागात पडणार? पंजाब यंदा मोठा झटका देणार; जाणून घ्या कोण येणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 10:46 PM2022-02-07T22:46:42+5:302022-02-07T22:55:25+5:30
Punjab Election 2022 Opinion Poll: पंजाब यंदा देशाला मोठा झटका देण्याच्या पवित्र्यात आहे. अवघ्या तेरा दिवसांवर मतदान आलेले असताना पंजाबमध्ये काँग्रेसची पाळेमुळेच उखडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अवघ्या तेरा दिवसांवर मतदान आलेले असताना पंजाबमध्ये काँग्रेसची पाळेमुळेच उखडली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एबीपी सीव्होटरच्या सर्व्हेत पंजाबमध्ये सत्तेत असलेली काँग्रेस सत्ता गमावताना दिसत आहे. तर भाजपाला त्याहूनही कमी जागा मिळण्याची शक्यता आहे.
पंजाब यंदा देशाला मोठा झटका देण्याच्या पवित्र्यात आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांच्या पंजाब लोक काँग्रेसने भाजपासोबत आघाडी केली आहे. तर आपही मोठ्या ताकदीने निवडणुकीत उतरली आहे. सर्व्हेनुसार काँग्रेसला 117 जागांपैकी 24 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आपला 55 ते 66 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अकाली दल महायुतीला 20 आणि 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला तीन ते 11 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर अपक्षांना 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 59 जागांची गरज आहे.
मतांच्या टक्केवारीतही आप जास्त...
यंदा आपला सर्वाधिक मते मिळण्याची शक्यता आहे. आपला ४० टक्के, काँग्रेसला ३०, अकाली दल युतीला 20 टक्के तर भाजप युतीला 8 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
गोव्यात काय होणार?
गोवा विधनसभा निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. सर्व्हेच्या अंदाजानुसार, गोव्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते. गोव्यात भाजपला सर्वाधिक म्हणजे ३० टक्के मते मिळतील, तर काँग्रेस आणि आप पक्षाला प्रत्येकी २४ टक्के मते मिळतील. एमजीपी आणि मित्रपक्षाला ८ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. अन्यना १४ टक्के मते मिळण्याची शक्यता सर्व्हेतून वर्तवण्यात आली आहे. सर्व्हेमध्ये भाजपला ४० पैकी १४ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला १० ते १४ जागा मिळू शकतात. त्याशिवाय आम आदमी पक्षाला ४ ते ८ जागा मिळू शकतात. तर एमजीपीला ३ ते ७ जागांवर समाधान मानावे लागेल. तर अन्य अथवा अपक्षांना ० ते २ जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये काय होणार?
सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते. २०१७ पेक्षा चांगली कामगिरी करत भाजपला २२५-२३७ जागा मिळू शकतात, तर सपाला १३९-१५१ जागा मिळू शकतात. बसपाला १३-२१ जागांवर समाधान मानावे लागेल. काँग्रेसला फक्त ४-८ आणि इतरांना २-६ जागा मिळू शकतात असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.