Punjab Election 2022 : ... तोवर लग्न करणार नाही, निवडणुकीपूर्वी नवज्योत सिंग सिद्धूंच्या मुलीचं इमोशनल कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 02:28 PM2022-02-11T14:28:17+5:302022-02-11T14:29:21+5:30
Punjab Election 2022 : नवज्योत सिंग सिद्धू यांची कन्या राबिया सिद्धू हीदेखील आता निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.
पंजाबमधील (Punjab Election 2022) अमृतसर पूर्व विधानसभेतून काँग्रेसच्यावतीनं (Congress) निवडणूक लढवणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Siddhu) यांची मुलगी राबिया सिद्धूही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी बिक्रम मजिठिया यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.
"मजिठामध्ये अगदी किराणा दुकानातही नशा विकली जाते आणि कोणाला मत द्यायचे हे सर्वांना माहीत आहे," असं राबिया सिद्धू हिनं सांगितलं. आपल्या आईनं भावूक होत पैसे नसल्याचं सांगितलं, आता जो पर्यंत वडील निवडणूक जिंकणार नाहीत, तोवर आपण लग्नच करणार नाही, असं राबिया सिद्धू म्हणाली. "कोणाची कोणासोबत लढत आहे? ड्रग्सपासून आपल्याला मुलांना वाचवायचं आहे की त्यांना ड्रग्समध्ये गुंतवायचं आहे. माझे वडील सत्याच्या मार्गावर उभे आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासमोर समस्या येत असतात," असंही ती म्हणाली.
सत्य असत्याची लढाई
"पैशांमुळे माणसं विकली जातात, पण यावेळी विकली जाणार नाहीत. बिक्रम मजिठिया इतर कुठूनही का निवडणूक लढत नाहीत, ते इथून का लढत आहेत. ते दोन ठिकाणांहून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे. मजिठिया यांनी त्यांच्या वडिलांकडून राजकारण शिकलंय. आज सत्य आणि असत्याची लढाई आहे," असंही राबिया हीनं सांगितलं.
आता पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी ऐवजी २० फेब्रुवारी २०२२ रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे. संत रविदास जयंतीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. मतदानाची तारीख एक आठवडा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात सर्वांकडून करण्यात आली होती.