Punjab Exit Poll Results 2022: पंजाबमध्ये केजरीवालांच्या 'झाडू'नं काँग्रेसची साफसफाई; आणखी एक राज्य 'हाता'तून जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 07:02 PM2022-03-07T19:02:11+5:302022-03-07T19:06:10+5:30
Punjab Exit Poll Results 2022: पंजाबमध्ये आप सुस्साट; काँग्रेसला मोठा धक्का
नवी दिल्ली: पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार येईल, असा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवला आहे. इंडिया टुडे-ऍक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पंजाबमधील काँग्रस सरकारला मोठा धक्का बसताना दिसत आहे. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा करिश्मा पंजाबमध्ये पाहायला मिळत आहे.
पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण ११७ जागा आहेत. यापैकी ७६ ते ९० जागांवर आम आदमी पक्षाला यश मिळेल, असं सर्वेक्षण सांगतं. तर गेल्या निवडणुकीत ७७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसची वाताहत होताना दिसत आहे. काँग्रेसला १९ ते ३१ जागा मिळतील असा अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपसोबतची युती तोडणाऱ्या शिरोमणी अकाली दलाला ७ ते ११ जागा मिळू शकतात.
पंजाबमध्ये आपला ४१ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे दिल्लीनंतर पंजाबमध्ये आपचं सरकार येईल. गेल्या निवडणुकीत आपनं २० जागा जिंकल्या होत्या. या जागा आता चौपट होताना दिसत आहेत. पंजाबमध्ये आपला २८ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे. भाजपला ७ टक्के मतं मिळू शकतात.