चंदीगड : पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने पुरोगामी पाऊल उचलत मुलींना बालवाडी ते पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण नि:शुल्क देण्याची घोषणा केली आहे. अर्थमंत्री मनप्रीत बादल यांनी राज्याचा २०१७-१८ चा अर्थसंकल्प मंगळवारी विधानसभेत सादर केला. त्यात ही घोषणा करण्यात आली. त्यांनी १०५८०.९९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प ६३८३.०१ कोटी रुपयांचा होता. अमरिंदरसिंग सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यात कृषी, रोजगारनिर्मिती, शिक्षण आणि रिअल इस्टेट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी १५०० कोटी रुपये हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे.
पंजाबमध्ये मुलींना पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण मोफत
By admin | Published: June 21, 2017 3:17 AM