गहू खरेदीत पंजाब, हरयाणा पिछाडीवर; २०१८-१९ पासून मध्य प्रदेश अग्रणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 06:06 AM2020-12-26T06:06:20+5:302020-12-26T06:06:54+5:30
wheat : गहू विपणन हंगाम २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षातील आकडेवारीनुसार मध्य प्रदेशातील ४७.५८ लाख शेतकऱ्यांनी गहू खरेदीचा लाभ घेतला.
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षातील आकडेवारीनुसार गहू खरेदीचा लाभ घेण्यात पंजाब, हरियाणा येथील शेतकरी मागे पडला असून मध्य प्रदेश मात्र अग्रणी आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी गहू खरेदीच्या बाबतीत पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांपेक्षा किमान हमी भावाचा जास्तीत जास्त लाभ मिळविला असल्याने मध्य प्रदेशातील शेतकरी सध्या चालू असलेल्या आंदोलनापासून दूर आहेत.
गहू विपणन हंगाम २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षातील आकडेवारीनुसार मध्य प्रदेशातील ४७.५८ लाख शेतकऱ्यांनी गहू खरेदीचा लाभ घेतला. तुलनेत पंजाबच्या ४४.५६ लाख आणि हरियाणातील ३७.३० लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशात २०२०-२१ मध्ये १२९.४२ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली. तर पंजाब आणि हरियाणात हे प्रमाण अनुक्रमे १२७.१४ लाख टन आणि ७४ लाख टन राहिले.