शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

शहीद जवानाला तीन वर्षांच्या मुलाने दिला मुखाग्नी, संपूर्ण गावाचे डोळे पाणावले 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 11:30 AM

सीमारेषेवर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना जवान बलजीत सिंग (वय 35 वर्ष) यांना वीरमरण आले. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान बलजीत सिंग शहीद झाले. बलजीत सिंग यांच्या पार्थिवावर बुधवारी (13 फेब्रुवारी) मूळ गाव डिंगर माजरा येथे लष्करी इतमामात अंत्यदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देदहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जवान बलजीत सिंग शहीदसिंग यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार 3 वर्षांच्या मुलानं दिला मुखाग्नि

कर्नाल - सीमारेषेवर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना जवान बलजीत सिंग (वय 35 वर्ष) यांना वीरमरण आले. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान बलजीत सिंग शहीद झाले. बलजीत सिंग यांच्या पार्थिवावर बुधवारी (13 फेब्रुवारी) मूळ गाव डिंगर माजरा येथे लष्करी इतमामात अंत्यदर्शन करण्यात आले. 'भारत माता की जय' या जयघोषात ग्रामस्थांनी आपल्या वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला. शहीद जवान बलजीत सिंग यांचा अवघ्या तीन वर्षांचा मुलगा अर्णवनं त्यांना मुखाग्नी दिला. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या क्षणाच्या वेळेस संपूर्ण गाव हळहळले.  

मेजर जनरल यांच्या नेतृत्वाखालील लष्करी तुकडी आणि जिल्हा पोलिसांच्या पथकाने बलजीत सिंग यांनी सलामी दिली. यावेळेस 'भारत माता की जय, शहीद बलजीत सिंग अमर रहे', या जयघोषांसहीत साश्रू नयनांनी सिंग यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.   

शहीद जवान बलजीत सिंग अमर रहे!शहीद जवान बलजीत सिंग 50 राष्ट्रीय रायफलमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी उशिरा रात्री 2.30 वाजता रत्नीपुरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. यानंतर जवानांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. परिसरातील एका घरात आणि शाळेमध्ये दहशतवादी लपून बसले होते. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत बलजीत सिंग यांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. पण चकमकीदरम्यान सिंग गंभीर जखमी झाले. यानंतर सिंग यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPunjabपंजाबterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर