अमृतसर:पंजाबच्या अमृतसर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बीएसएफ जवान एसके सत्तेप्पा उर्फ 'कटप्पा'ने आज सकाळी बीएसएफ मुख्यालयातील मेसमध्ये आपल्या सोबतच्या इतर बीएसएफ जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. या धक्कादायक घटनेत 10 जवान जखमी झाले असून त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कटप्पाने स्वतःवरही गोळी झाडली. अशाप्रकारे या घटनेत आतापर्यंत एकूण 5 जवानांचा मृत्यू झाला आहे.
यामुळे झाडल्या गोळ्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कटप्पा गेल्या काही दिवसांपासून त्रस्त होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली ड्युटी बदलावी यासाठी प्रयत्न करत होता. शनिवारी कटप्पाचा बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी वादही झाला. यानंतर रविवारी सकाळी ड्युटीवर असताना कटप्पाला अचानक राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात बंदुकीतून गोळीबार सुरू केला. बंदुकीचा आवाज ऐकून इतर सैनिक इकडे-तिकडे धावू लागले, तिथे सुमारे 10 जणांना गोळ्या लागल्या. घटनेनंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयाबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होताया घटनेनंतर मीडिया कर्मचार्यांना अद्याप आवारात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली नाही. तसेच, रुग्णालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. याबाबत अधिकारी अद्याप काहीही बोलण्यास तयार नाहीत. घटनेनंतर मृत आणि जखमी जवानांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली जात आहे. बीएसएफचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेण्याची तयारीही सुरू केली आहे.