‘आप’चे तीन निलंबित आमदार काँग्रेसमध्ये; मुख्यमंत्र्यांची पक्षांतर्गत विरोधकांवर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 07:57 AM2021-06-04T07:57:58+5:302021-06-04T07:58:21+5:30

कॅप्टन सिंग हे कोणतीही खेळी खेळू शकत नाहीत आणि कठोरपणे वागणारही नाहीत, असा समज असलेले अखिल भारतीय काँग्रेस समितीतील नेते आणि सिंग यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना हा संदेशच दिला गेला आहे.

in punjab Three suspended AAP MLAs joins Congress | ‘आप’चे तीन निलंबित आमदार काँग्रेसमध्ये; मुख्यमंत्र्यांची पक्षांतर्गत विरोधकांवर मात

‘आप’चे तीन निलंबित आमदार काँग्रेसमध्ये; मुख्यमंत्र्यांची पक्षांतर्गत विरोधकांवर मात

Next

- व्यंकटेश केसरी

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आम आदमी पक्षाचे (आप) तीन आमदार काँग्रेस पक्षात आणून आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना गुरुवारी धक्का दिला. राज्यात येत्या फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंग यांनी सर्वसमावेशक व्हावे यासाठी हे विरोधक त्यांच्यावर दडपण आणत असताना त्यांनी हे आमदार आणले.

कॅप्टन सिंग हे कोणतीही खेळी खेळू शकत नाहीत आणि कठोरपणे वागणारही नाहीत, असा समज असलेले अखिल भारतीय काँग्रेस समितीतील नेते आणि सिंग यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना हा संदेशच दिला गेला आहे.

सिंग हे गुरुवारी नवी दिल्लीत दाखल व्हायच्या काही तास आधी ही घडामोड घडली. सिंग आले होते ते गटातटांनी त्रासलेल्या पंजाब काँग्रेसमध्ये ऐक्य घडवून आणण्यासाठी एआयसीसीच्या तीन सदस्यांच्या समितीला भेटण्यास. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे या समितीचे प्रमुख आहेत. कॅप्टन सिंग हे समितीला गुरुवारी भेटले की शुक्रवारी भेटणार हे अजून स्पष्ट झाले नाही. सिंग यांच्या जवळच्या सूत्रांनी म्हटले की, भेटीनंतर ते काम पूर्ण होऊ शकेल.

विरोधी पक्ष दलित मुख्यमंत्री हे कार्ड खेळत असून कॅप्टन सिंग यांची काम करण्याची पद्धत आणि पक्षातील गटातटांतील संघर्षामुळे विधानसभा निवडणूक पक्षाला वाटते तेवढी सोपी असणार नाही हे लक्षात आल्यावर एआयसीसीने ऐक्य घडवून आणण्याची कसरत सुरू केली. परंतु, सिंग यांना आपण परिस्थितीवर हुकमत गाजवू असा आत्मविश्वास आहे. 

हे आहेत आमदार
आम आदमी पक्षाचे निलंबित झालेले तीन आमदार असे सुखपाल खैरा, परिमल सिंग आणि जगदेव सिंग कमालू.

Web Title: in punjab Three suspended AAP MLAs joins Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.