UP, Pujab 5 States Elections : देशात पाच राज्यांच्या निवडणुकांचं (Elections) बिगुल लवकरच वाजणार आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात येणार आहे. यानंतर कोणत्या राज्यात किती टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल याचं चित्र स्पष्ट होईल. पुढील काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर, पंजाब आणि गोवा या प्रमुख राज्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत.एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या देशात वाढत आहे, ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत, अशाही परिस्थितीत केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा निवडणुका घेण्यावर ठाम आहे. पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांकडे लागलं आहे. याचं कारण उत्तर प्रदेशातील कल लोकसभा निवडणुकांचं चित्र काही प्रमाणात स्पष्ट करू शकतो, असं म्हटलं जातं.
५ राज्यांपैकी ४ राज्यांमध्ये एनडीएचं सरकार आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी, गोव्यात प्रमोद सावंत, मणिपुरमध्ये नोगथोम्बन बीरेन सिंग आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे चरणजीत सिंग चन्नी हे मुख्यमंत्री आहेत.