चंडीगड: आपने आज पंजाबच्या नव्या मंत्रिमंडळाला शपथ दिली आहे. आज पहिल्या फेरीत दहा जणांना मंत्रीपद देण्यात आले. यादी पाहून अनेकांना डावलल्याची चर्चा आहे. बादल पिता-पूत्र, चरणजीत सिंग चन्नी आणि नवज्योतसिंग सिद्धू यांना हरविणाऱ्या जायंटकिलरना तसेच ज्या आमदारांनी गेली पाच वर्षे आपचे भक्कम पाय पंजाबच्या मतदारांत रोवले, त्यांना संधी दिलेली नाही.
पंजाबमध्ये २०१७ ला २० आपचे आमदार निवडून आले होते. त्यापैकी दोघांनाच मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. दुसऱ्यांदा आमदार झालेल्यांना दूर ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. हरपाल सिंह चीमा आणि गुरमीत सिंह मीत हायर यांना मंत्री बनविण्यात आलेले आहे. अन्य आठ जण हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत.
भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होणार्या 10 मंत्र्यांमध्ये हरपाल सिंग चीमा, डॉ. बलजीत कौर, हरभजन सिंग ईटीओ, डॉ. विजय सिंगला, गुरमिर सिंग मीत हायर, हरजोत सिंग बैंस, लाल चंद कटारुचक, कुलदीप सिंग धालीवाल, लालजीत सिंग भुल्लर, ब्रह्म.शंकर झिंपा यांचा समावेश आहे. परंतू ज्या आमदारांनी मोठमोठ्या हस्तींना हरविण्याची किमया साधली त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही.
जातीय समीकरण साधलेमंत्र्यांच्या पहिल्या यादीत आम आदमी पक्षाने अनुसूचित जातीच्या 4 आमदारांना स्थान दिले आहे. आजच्या मंत्रिमंडळात 4 जाट, 4 अनुसूचित जाती, 2 हिंदू आणि फक्त 1 महिलेचा समावेश आहे.
कुलतार सिंग संधवान विधानसभा अध्यक्षनियमांनुसार भगवंत मान आपल्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त १७ मंत्री नेमू शकतात. पंजाब विधानसभेत 117 सदस्य आहेत. कोटकपुरा येथून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले कुलतार सिंग संधवान हे पंजाब विधानसभेचे अध्यक्ष असणार आहेत.