चंदीगढ- 27 नोव्हेंबर 2016 रोजी पतियाळामधील नभा तुरुंगातून पळून जाणाऱ्या सहा कैद्यांपैकी एक असणाऱ्या विकी गौंडरला ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. तुरुंगातून 6 कैदी पळाल्यापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. तुरुंगातून पळून जाणाऱ्या या 6 लोकांमध्ये विकी आणि आणि त्या घटनेचा मास्टरमाइंड प्रेमा लाहोरिया यांना पोलिसांनी आज कंठस्नान घातले. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.विकीचे मूळ नाव हरजिंदर सिंग भुल्लर असे होते. तुरुंगातून पळून गेल्यानंतर पंजाब पोलिसांसाठी त्य़ाला पकडणे डोकेदुखी झाली होती. त्याला पकडण्याचा पोलिसांनी अनेकदा प्रयत्न केला होता मात्र तो निसटून जाण्यात यशस्वी झाला होता असे पंजाब पोलिसांचे डीजीपी (गुप्तचर) दिनकर गुप्ता यांनी चंदिगढमध्ये बोलताना सांगितले. ''तो लपण्याची शक्यता असलेल्या जागांवरही पोलिसांनी छापे घातले होते मात्र तरिही तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. तसेच एप्रिल 2017 मध्ये त्याने गुरुदासपूरमध्ये एका विरुद्ध गटाच्या तीन सदस्यांची हत्याही केली होती. त्यामुळेच पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते'', अशी माहिती गुप्ता यांनी दिली. विकी हा मूळचा मुक्तसरमधील बोडला या गावातील रहिवासी होता. जयपाल सिंग नावाच्या कुख्यात गुंडाच्या गँगमध्येही तो होता. त्याच्या विरुद्ध गटातील सुखा काहलवानची हत्या 2015 च्या जानेवारी महिन्यात केल्यानंतर विकी प्रकाशात आला होता.
पंजाबमधील मोस्ट वॉण्टेड गँगस्टरला कंठस्नान, तुरुंगातून पळून गेला होता विकी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 5:34 PM
7 नोव्हेंबर 2016 रोजी पतियाळामधील नभा तुरुंगातून पळून जाणाऱ्या सहा कैद्यांपैकी एक असणाऱ्या विकी गौंडरला ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. तुरुंगातून 6 कैदी पळाल्यापासून पोलीस त्यांच्या मागावर होते.
ठळक मुद्देडिसेंबर 2015 रोजी विकीला अटक होऊन नभा तुरुंगात डांबण्यात आले. प्रेमा लाहोरिया आणि काही साथीदारांसह तो नोव्हेंबर 2016मध्ये तो तुरुंगातून पळून गेला.