उंदरगावला कायमस्वरुपी शुद्ध पाण्याचे ध्येय (240 चौसेमी बजेट)
By admin | Published: February 20, 2016 2:01 AM
माढा तालुक्यातील उंदरगाव ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून पहिली महिला सरपंच होण्याचा मान आपणाला मिळाला असून, आता गावाला कायमस्वरुपी गोड पाण्याची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुळात गावाला पाणी देण्यासाठी आम्ही नेहमीच वैयक्तिकरित्या उदार मन ठेवले आहे. आमच्या घराण्यातच समाजसेवेचा वसा घेतला आहे. शासनाने पाण्यासाठी टँकर दिला नाही तोपर्यंत आम्ही स्वखर्चाने गावाला पाणी दिले. आमदार बबनदादा यांची आमच्या गावावर कृपा आहे. त्यांच्या फंडातून गावात हायमास दिवा, गणपती, विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा तसेच मशिदीचा जीर्णाेद्धार केला असून, सभामंडप बांधला आहे. महिलांसाठी सार्वजनिक शौचालये बांधली आहेत.
माढा तालुक्यातील उंदरगाव ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून पहिली महिला सरपंच होण्याचा मान आपणाला मिळाला असून, आता गावाला कायमस्वरुपी गोड पाण्याची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुळात गावाला पाणी देण्यासाठी आम्ही नेहमीच वैयक्तिकरित्या उदार मन ठेवले आहे. आमच्या घराण्यातच समाजसेवेचा वसा घेतला आहे. शासनाने पाण्यासाठी टँकर दिला नाही तोपर्यंत आम्ही स्वखर्चाने गावाला पाणी दिले. आमदार बबनदादा यांची आमच्या गावावर कृपा आहे. त्यांच्या फंडातून गावात हायमास दिवा, गणपती, विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा तसेच मशिदीचा जीर्णाेद्धार केला असून, सभामंडप बांधला आहे. महिलांसाठी सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. गावात इंटरनेटचे जाळे पुरवून नव्या पिढीला सतत जगाच्या संपर्कात ठेवणे आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. जि. प. शाळेला आयएसओ करण्यासाठी तयारी केली आहे. गावात बंद गटारी करणे, पावसाळ्यात रस्त्याकडेला झाडे लावून सुशोभीकरण करायचे आहे. वाड्यावस्त्यांवर जाणारे रस्ते करायचे आहेत. कोटप्रथमच महिलेची सरपंचपदी निवड झाल्याने त्याची एक वेगळी छाप पाडण्यासाठी प्रयत्नशील आहे. गावाला नदी असली तरी नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत हा खारा आहे. त्यामुळे गावाजवळ एक मोठे शेततळे घेऊन त्यामध्ये किमान 6 महिने पुरेल इतके एक कोटी लिटर पाणी साठवून ते शुद्ध करुन गावाला पुरवण्यासाठी खर्चाचा आराखडा तयार केला आहे. सरपंचकोटउंदरगाव हे एका विचाराने चालणारे गाव असून, या गावाला दिलेल्या निधीचा लोक चांगला उपयोग करतात. उंदरगावचा खार्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.-बबनदादा शिंदेआमदार