नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना करण्यात येणाऱ्या इथेनॉल पुरवठ्याच्या किमतीत सुधारणा करतानाच यासंबंधीच्या धोरणात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने बदल केला आहे. पेट्रोलमध्ये मिश्रण करून विकण्यासाठी कंपन्यांना इथेनॉलचा पुरवठा होतो.१ डिसेंबर २0१६ ते ३0 सप्टेंबर २0१७ या पुरवठा काळासाठी इथेनॉलची पुरवठा किंमत ३९ रुपये प्रति लिटर अशी ठरविण्यात आली आहे. याशिवाय एक्साईस ड्युटी, व्हॅट अथवा जीएसटी हे कर आणि वाहतूक खर्च यापोटी वेगळा आकार पुरवठादारांना मिळेल. ही किंमत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या किरकोळ पेट्रोल विक्रीच्या दरानुसार बदलू शकेल. उपरनिर्दिष्ट इथेनॉल पुरवठा काळात सरकार किमतीचा आढावा घेऊ शकेल अथवा योग्य सुधारणा करू शकेल. त्या त्या काळाची आर्थिक स्थिती आणि अन्य घटक लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. किमतींत स्थैर्य राहावे, तसेच इथेनॉल पुरवठादारांना योग्य मोबदला मिळावा, हा उद्देश नजरेसमोर ठेवूनच आढावा प्रक्रिया राबविली जाईल. मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर १0 डिसेंबर २0१४ रोजी इथेनॉल खरेदी सुरू केली होती. त्या आधी २00६ पासून ही खरेदी बंद होती. इथेनॉल खरेदीची किंमत कर आणि वाहतूक खर्चासह ४८.५0 रुपये ते ४९.५0 रुपये या दरम्यान राहील, असे ठरविण्यात आले. या निर्णयामुळे इथेनॉलचा पुरवठा वाढला. २0१४-१५ मध्ये इथेनॉल पुरवठा ६७.४ कोटी लिटरने वाढला. २0१५-१६ च्या इथेनॉल वर्षासाठी १२0 कोटी लिटरचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
इथेनॉलची खरेदी किंमत निश्चित
By admin | Published: October 14, 2016 1:50 AM