भुवनेश्वर : पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेवर बहिष्कार घातल्याच्या वादात शुक्रवारी दोन केंद्रीय मंत्री आणि आसामच्या राज्यपालांनी उडी घेतल्यामुळे राजकीय कलाटणी मिळाली आहे. पुरी रथयात्रेवर निर्बंध आणत राज्य सरकारने हस्तक्षेप करायला नको होता, असा सूर व्यक्त होऊ लागला आहे.पुरीचे शंकराचार्यांच्या हस्ते रथ ओढून रथयात्रेला प्रारंभ करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. यावेळी स्वामी निश्चलानंद यांनी राज्य सरकारने आणलेल्या बंधनामुळे २९ जून रोजी रथयात्रेत सहभागी होण्याचे टाळले. एवढ्या वर्षांची परंपरा मोडीत काढणे स्वीकारार्ह नाही, असे ओडिशाचे माजी राज्यपाल जे.बी. पटनाईक यांनी म्हटले. धर्मनिरपेक्ष देशात सरकारने कोणत्याही समुदायाच्या धार्मिक कार्यक्रमात हस्तक्षेप करायला नको, अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुरी येथे भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्यानंतर दिली. शंकराचार्यांना भेटणार काय, यावर त्यांनी वेळेअभावी सध्या ते शक्य होणार नाही. नंतर निश्चितच भेटणार असे उत्तर पत्रकारांना दिले.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी. रथयात्रेची परंपरा मोडित काढण्यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई व्हायलाच हवी. राज्य सरकारने या वादात पडणे दुर्दैवी बाब आहे, असे केंद्रीय आदिवासी विकासमंत्री ज्युएल ओराम यांनी म्हटले.(वृत्तसंस्था)शंकराचार्यांना रथावर चढण्यास मज्जाव करणे खेदजनक आहे. त्यांना अटकाव घालणारे पत्र राज्य सरकारने पाठवले होते, हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया आसामचे राज्यपाल (ओडिशाचे माजी मुख्यमंत्री) जे.बी. पटनाईक यांनी दिली. (वृत्तसंस्था)
पुरी शंकराचार्यांचा बहिष्कार वाद उफाळला
By admin | Published: July 05, 2014 5:21 AM