राहुल गांधींच्या याचिकेवर पूर्णेश मोदी, गुजरात सरकारला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 06:08 AM2023-07-22T06:08:41+5:302023-07-22T06:09:14+5:30
उच्च न्यायालयाने राहुल यांची मागणी करणारी याचिका फेटाळली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोदी आडनावावरील टिप्पणीशी संबंधित गुन्हेगारी मानहानीच्या खटल्यातील गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी आणि गुजरात सरकारला नोटीस जारी करून उत्तर देण्यास सांगितले.
उच्च न्यायालयाने राहुल यांची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती पी. के. मिश्रा यांच्या खंडपीठाने राहुल यांच्या अर्जावर सुनावणी करताना पूर्णेश मोदी आणि गुजरात सरकारला नोटीस बजावली. खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. खंडपीठाने सांगितले की, या टप्प्यावर प्रश्न हा आहे की शिक्षेला स्थगिती द्यायची का? यावर वकील अभिषेक सिंघवी म्हणाले की, गांधींना १११ दिवस त्रास सहन करावा लागला आहे.