नव्या जमान्यातला पुष्पा! मुख्यमंत्र्यांच्या बाजुला बसून लाकूड चोर भरपेट जेवला, सेल्फीही घेतला; कोणाल खबरही लागली नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 02:50 PM2023-04-17T14:50:04+5:302023-04-17T14:50:28+5:30

उत्तर प्रदेशमध्ये माफिया कम राजकारण्याला पोलिसांच्या गराड्यात असताना गोळ्या झाडण्यात आल्याचा प्रकार ताजा असताना तिकडे मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे.

Pushpa in the new era! Sitting next to the CM shivraj singh chouhan, the wood thief had a take meal and also took a selfie in Madhya Pradesh | नव्या जमान्यातला पुष्पा! मुख्यमंत्र्यांच्या बाजुला बसून लाकूड चोर भरपेट जेवला, सेल्फीही घेतला; कोणाल खबरही लागली नाही...

नव्या जमान्यातला पुष्पा! मुख्यमंत्र्यांच्या बाजुला बसून लाकूड चोर भरपेट जेवला, सेल्फीही घेतला; कोणाल खबरही लागली नाही...

googlenewsNext

उत्तर प्रदेशमध्ये माफिया कम राजकारण्याला पोलिसांच्या गराड्यात असताना गोळ्या झाडण्यात आल्याचा प्रकार ताजा असताना तिकडे मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बाजुला बसून एका चोराने जेवन केले आणि सेल्फीदेखील घेतल्याचे समोर आले आहे. जेव्हा याचा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा मात्र पोलिसांची धावाधाव सुरु झाली आहे. 

शनिवारी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निवासी भुखंडांचे वाटप करण्यात आले. यानंतर चौहान यांनी लाभार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी शिवराज यांच्या बाजुला लाकूड चोरीच्या गुन्ह्यात दोन दिवसांची पोलीस कोठडीची हवा खाऊन आलेला चोर बसला होता. याचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होऊ लागताच जिल्हा प्रशासनासह पोलिसांची खिल्ली उडविली जाऊ लागली आहे. 

धैहनी विधानसभा मतदारसंघातील हा प्रकार आहे. त्यांच्या बाजुला बसलेला चोर हा अरविंद गुप्ता आहे. तो चोरटा आहे हे शिवराज यांना माहिती नव्हते, परंतू पोलिसांना तर याची कल्पना होती. शिवराज यांनी दोन -तीन मिनिटे अरविंद गुप्ताशी चर्चाही केली. त्याच्या पाठीवर थापही मारली. आता याचे कारण समोर आलेले नसले तरी प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. 

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत थोडीशीही चूक असत नाही. जिल्हा प्रशासनाचे सर्व बडे अधिकारी त्या ठिकाणी होते. कलेक्टर, एसपी, सीईओ ते तेथील पोलीस ठाण्याचे पोलीस आणि अधिकारी होते. मुख्यमंत्र्यांच्या बाजुला बसून कोण जेवत आहे, याकडे एकाचेही लक्ष कसे गेले नाही, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. 

Web Title: Pushpa in the new era! Sitting next to the CM shivraj singh chouhan, the wood thief had a take meal and also took a selfie in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.