ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही, युध्दाने मारले अशा संदेशाचा फलक हाती घेतलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणा-या गुरमेहर कौरवरुन दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता या वादात हरयाणा सरकारमधील मंत्री अनिल वीज यांनी उडी घेतली आहे.
गुरमेहरचे समर्थन करणा-यांना पाकिस्तानबद्दल कळवळा असून, त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य अनिल वीज यांनी केले आहे. हरयाणामध्ये भाजपाचे सरकार आहे. अनिल वीज यांचे वादग्रस्त विधान करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी सुद्धा त्यांनी अशी विधाने केली आहेत.
आणखी वाचा
गुरमेहरच्या भूमिकेवरुन सध्या दोन गट पडले असून, काहींनी तिचे समर्थन केलेय तर, काही जण तिच्या विरोधात आहेत. दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौरला बलात्काराच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. तिच्या समर्थनार्थ मंगळवारी डाव्या विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढला होता. विरेंद्र सेहवागच्या टि्वटनंतर या संपूर्ण प्रकरणातील वातावरण अधिकच तापले. सेहवागने आपला एका फोटो टि्वट केला. त्यावर त्याने दोन त्रिशतके मी नाही तर, माझ्या बॅटने केली असे टि्वट केले होते.
Those supporting #GurmeharKaur are pro-Pakistan,therefore such people should be thrown out of the country:Anil Vij,Haryana Minister pic.twitter.com/sRVcZ1Azgi— ANI (@ANI_news) March 1, 2017