ऑनलाइन लोकमतथिरुवनंतपुरम, दि. १८ - कोल्लम येथील पुत्तींगल देवीच्या मंदिरात लागलेल्या आगीत जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी इन्फोसिस फाऊन्डेशन पुढे सरसावले आहे. या आगीच्या दुर्घटनेतील जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. त्यांच्यासाठी इन्फोसिस फाऊन्डेशनने ३५ लाख रुपयांची रुग्णालयात लागणारी उपकरणे आणि औषधे दिली आहेत.येथील एका कार्यक्रमात इन्फोसिसचे केरळचे प्रमुख सुनील जोश यांनी रुग्णालयांत लागणारी उपकरणे आणि औषधे मेडिकल कॉलेजचे अधिक्षक डॉ. के. मोहनदास यांच्याकडे सुपूर्द केले. यामध्ये चार व्हेंटिलेटर्स, १५ अल्फा बेड्स, तीन लाख रुपयांची औषधे, ५०० चादरी आणि काही साहित्यांचा समावेश आहे. गेल्या १० एप्रिलला पुत्तींगल मंदिराला फटाक्यांमुळे आग लागली होती. यामध्ये १०८ लोकांचा मृत्यू झाला, तर ३०० हून जास्त जण जखमी झाले आहेत.
पुत्तींगल आग दुर्घटना : जखमींना इन्फोसिसची मदत
By admin | Published: April 18, 2016 7:45 PM