शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

पुत्तिंगल मंदिर अग्निकांड नियमांच्या उल्लंघनामुळे?

By admin | Published: April 12, 2016 2:40 AM

ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ हाताळण्याच्या संदर्भातील सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आल्याची आणि खबरदारीच्या मूलभूत उपायांकडे दुर्लक्ष करून आतषबाजीवरील बंदी

कोल्लम : ज्वलनशील किंवा स्फोटक पदार्थ हाताळण्याच्या संदर्भातील सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आल्याची आणि खबरदारीच्या मूलभूत उपायांकडे दुर्लक्ष करून आतषबाजीवरील बंदी आदेशही पायदळी तुडविण्यात आल्याची गंभीर बाब पुत्तिंगल देवी मंदिर अग्निकांडाच्या दुसऱ्या दिवशी उघडकीस आली आहे. केरळ उच्च न्यायालयानेही दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून, अतिउच्च आवाजाच्या वा तसा परिणाम घडवून आणणाऱ्या फटाक्यांवर राज्यातील सर्वच मंदिरात बंदी असावी, असे मत न्यायमूर्तींनी व्यक्त केले आहे. लोकांना आपल्या धर्मानुसार पूजाअर्चा करण्याची पूर्ण परवानगी राज्यघटनेने दिली असली तरी धोकादायक अशा फटाक्यांचा वापर करावा, असा त्याचा अर्थ नाही,असे न्या. चिदम्बरेश यांनी म्हटले आहे.न्यायालयाच्या रजिस्ट्रारना त्यांनी या संदर्भात पत्रही पाठवले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या देवस्थानांबाबत निर्णय घेणाऱ्या खंडपीठाकडे मंगळवारी हे प्रकरण येणार आहे. त्यावेळी फटाक्यांच्या वापरावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मंदिरातील दुर्घटनेला अपवाद म्हणता येणार नाही, यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत, असे नमूद करून, माणसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळ्यासाठी कडक पावले उचलावीच लागतील, असे न्या. चिदम्बरेश यांनी म्हटले आहे.पोलिसांनी मंदिर व्यवस्थापनाच्या पदाधिकाऱ्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र व्यवस्थापनातील सर्व पदाधिकारी बेपत्ता असून, ते पळून गेले आहेत की स्फोटांत ते जखमी झाले वा मरण पावले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.‘स्फोटकांच्या बाबतीतील नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याचे दिसते. आतषबाजीसाठी वापरण्यात आलेल्या स्फोटकांचा तपास करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. फटाके बनविणाऱ्या निर्मात्यांनी प्रतिबंधित रसायनांचा वापर केला. याशिवाय खबरदारीच्या मूलभूत नियमांकडेही डोळेझाक करण्यात आली आहे,’ असे मुख्य स्फोटक नियंत्रक सुदर्शन कमल यांनी म्हटले आहे. दरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीला परवानगी देणे अथवा न देण्यासाठी आपल्यावर कुणीही दबाव टाकला नाही. मी केवळ माझे काम केले, असे कोल्लमच्या जिल्हाधिकारी ए. शायनामोल यांनी स्पष्ट केले. तर आतषबाजीवर घातलेल्या बंदीचे उल्लंघन करण्यात आले आहे. कुणी उल्लंघन केले, याचा तपास केला जात आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी शाहनवाज यांनी दिली.फटाक्यांच्या आतषबाजीला परवानगी नाकारण्यात आल्याच्या आदेशाची प्रत व्हायरल झाली आहे. पुतिंगल देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव जे. कृष्णकुट्टी पिल्लई यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अर्ज केला होता. पण तो फेटाळण्यात आला. फटाक्यांच्या आतषबाजीवरील बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या आदेशात नमूद केले आहे. ८ एप्रिल रोजीच हा आदेश जारी करण्यात आला होता. दरम्यान पुत्तिंगलजवळच्या अत्तिंगल येथे एका ठिकाणी साठवून ठेवण्यात आलेला १०० किलो स्फोटकांचा साठा पोलिसांनी जप्त केला. (वृत्तसंस्था)आतषबाजीवर बंदी नसल्याचा देवस्थाने मंडळाचा दावा थिरुवनंतपुरम : मंदिर परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यावर प्रतिबंध नाही, असा दावा, केरळमधील १२५५ मंदिरांचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रावणकोर देवस्थाने मंडळाचे अध्यक्ष प्रायार गोपालकृष्णन यांनी केला आहे. आतषबाजी हा पूजाविधीचा एक भाग आहे आणि त्यावर बंदी घालण्यास आमचा विरोध आहे, असे ते म्हणाले.थिरुवनंतपुरमच्या रुग्णालयात सोमवारी तीन जखमींचा मृत्यू झाला. आणखी ३८३ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.चौकशीसाठी पाचजण ताब्यात११० भाविकांचा बळी घेणाऱ्या अग्निकांडाच्या संदर्भात पुत्तिंगल मंदिर देवस्वम कमिटीच्या पदाधिकाऱ्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचजणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांची ओळख मात्र सांगितली नाही. या सहा जणांविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ आणि ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मंदिर परिसरात स्पर्धात्मक आतषबाजी आयोजित करणारे सुरेंद्रन आणि कृष्णाकुट्टी या दोन कंत्राटदारांना आरोपी बनविण्यात आले आहे.