नितीन अग्रवाल / नवी दिल्ली निती आयोगाच्या कामकाजाबद्दल संसदेच्या उच्चस्तरीय स्थायी समितीने प्रश्न विचारले आहेत. समितीचे म्हणणे, असे आहे की सरकारचा थिंक टँक म्हणून काम करणाऱ्या या आयोगाने गाजावाजा करून सुरू केलेल्या अनेक योजनांचे काय झाले हे काही समोर येत नाही.स्थायी समितीने संसदेत सादर केलेल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की आयोगाच्या अनेक योजना त्यांना दिल्या गेलेल्या निधीचा वापर करण्यात अपयशी ठरल्या आहेत. अर्थ मंत्रालयाकडून स्टार्ट अप आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी चालवल्या जात असलेल्या अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) आणि स्व-रोजगार व प्रतिभा उपयोगितेचा हवाला देऊन समितीने म्हटले आहे की त्यांच्यासाठी अनुक्रमे १५० व १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सुधारीत अंदाजामध्ये त्यात वाढ करण्यात आली परंतु स्पष्ट आदेश आणि सगळ््या पक्षांच्या सल्ल्याअभावी हा निधी खर्च केला गेला नाही. खूपच कमी पैसा खर्च केल्यामुळे एक चांगली योजना अपयशी ठरली.परिणामांचा विचार करून योजना तयार कराव्यातकाँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली अध्यक्ष असलेल्या या समितीने म्हटले आहे की योजना आयोगाची जागा घेतलेल्या निती आयोगाने परिणामांचा विचार करून योजना तयार करायला हव्यात. त्याचबरोबर सरकारला आयोगाची भूमिका स्पष्ट आणि कार्यप्रणालीला सरळ बनवायची सूचना केली. आयोगाची भूमिका आता पूर्वीच्या नियोजन आयोगासारखी राहिलेली नाही तर निव्वळ सरकारचा थिंक टँकच्या रुपात काम करताना धोरण बनवण्यात मदत केली पाहिजे. आयोगाने राज्यांराज्यांत होणाऱ्या पाणी वाटपावरील वादांना सोडवण्याचेही काम करावे असा सल्ला दिला. समितीने आयोगाच्या रचनेला अधिक व्यावहारिक करण्याचीही शिफारस करून त्यामुळे त्याला जास्त प्रभावीपणे काम करता येईल, असे म्हटले.
निती आयोगाच्या कामकाजाबद्दल संसदेच्या उच्चस्तरीय समितीला प्रश्न
By admin | Published: March 27, 2017 1:25 AM