शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

राहुलच्या नेतृत्वावर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2015 1:44 AM

काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांना पक्षाचा अध्यक्ष बनविण्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेत्यांमध्ये आता दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यादेखील सामील झाल्या आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांना पक्षाचा अध्यक्ष बनविण्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेत्यांमध्ये आता दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यादेखील सामील झाल्या आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेबाबत ‘शंका’ आहे व सोनिया गांधी यांनीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहिले पाहिजे, असे दीक्षित यांनी म्हटले आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वात एक प्रकारची ‘सहजता’ असते व पक्षाच्या पुनरुत्थानासाठी त्यांच्या अतियशस्वी आणि नियंत्रित नेतृत्वावर विश्वास ठेवला जाऊ शकेल, असे ७७ वर्षीय शीला दीक्षित यांनी एका मुलाखतीत सांगितले. त्या म्हणाल्या, ‘काय घडेल आणि काय घडणार नाही, हे मी सांगू शकणार नाही. राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनविले जाऊ शकते; परंतु सोनिया गांधी यांचे नियंत्रण आणि अति यशस्वी नेतृत्व राहिलेले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सहजता वाटते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची अद्याप चांगल्याप्रकारे पारख झालेली नाही व सोनिया गांधी यांनीच नेतृत्व करीत राहणे हे पक्षासाठी चांगले राहील. राहुल यांना पक्षाध्यक्षपदी नियुक्त करावे किंवा नाही, यावरून काँग्रेसमध्येच दोन विचारप्रवाह निर्माण झालेले असताना दीक्षित यांनी हे विधान केले आहे.