नवी दिल्ली : भारतरत्न मदर तेरेसा यांनी सुरू केलेल्या धर्मादाय संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या देशभरातील सर्व बालगृहांची तपासणी व पाहणी करण्याचे आदेश महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी दिले आहेत.झारखंडमधील मिशनरीज आॅफ चॅरिटिजच्या बालगृहातून लहान मुलांची विक्री करण्यात आल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आदेश दिले आहे. त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मनेका गांधी यांनी म्हटले आहे की, झारखंडमधील बालगृहातून मुलांची जी विक्री करण्यात आली, त्यामुळे देशाच्या सर्व राज्यांतील या संस्थेच्या बालगृहांची पाहणी व तपासणी होणे गरजेचे आहे, तसेच देशातील सर्वच बालगृहांची नोंदणी करण्यात यावी आणि सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स अॅथॉरिटीशी त्यांना संलग्न करण्यात यावे.जुवेनाइल जस्टिस कायद्यान्वये सर्व बालगृहे सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स अॅथॉरिटीशी संलग्न असणे बंधनकारक आहे. गेल्या आठ महिन्यांत सुमारे २३00 बालगृहांना संलग्नता मिळाली असून, अद्याप ४ हजार बालगृहांबाबत निर्णय व्हायचा आहे. देशातील बालगृहांमध्ये सुमारे २ लाख ३३ हजार मुले आहेत. अर्थात या बालगृहांतील सर्व मुलांना दत्तक योजनेत आणण्यात आलेले नाही.>पैसे घेतले, पण मूल नाही दिलेझारखंडमध्ये मिशनरीज आॅफ चॅरिटीजने मुलांना विकल्याचा आरोप झाला होता. संस्थेच्या कर्मचाºयांनी आपल्याकडून पैसे घेतले, पण प्रत्यक्षात मूल दिले नाही, अशी तक्रार एका जोडप्याने केल्याने हा प्रकार उघडकीस आला. या आरोपांमुळे ही संस्था भलतीच अडचणीत आली असून, काही भाजपा नेत्यांनी तर मदर तेरेसा यांना देण्यात आलेला भारतरत्न हा किताब केंद्र सरकारने काढून घ्यावा, अशी मागणी केली आहे.
'सर्व बालगृहांची त्वरित तपासणी करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 5:21 AM