नवी दिल्ली : केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी २०१७ सालातील एका ट्विटमध्ये प्रख्यात संगीतकार ए. आर. रहमान यांचे माँ तुझे सलाम हे गाणे वापरल्याने कॉपीराईट कायद्याचा भंग होत असल्याची तक्रार ट्विटरकडे आली होती. त्यानुसार कारवाई करत रविशंकर प्रसाद यांचेट्विटर खाते एका तासासाठी ब्लॉक करण्यात आले होते.
१९७१च्या बांगलादेश युद्धात भारत जिंकला होता. त्या विजय दिनाच्या निमित्ताने रविशंकर प्रसाद यांच्या ट्विटर हँडलवर एका ट्विटमध्ये पार्श्वभूमीला ए.आर. रहेमान यांचे गाणे वापरण्यात आले होते. त्यामुळे कॉपीराइट कायद्याचा भंग होत आहे, अशी नोटीस सोनी म्युझिक एंटरटेनमेन्टच्या वतीने इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फोनोग्राफिक इंडस्ट्री (आयएफपीआय) या संघटनेने २४ मे रोजी ट्विटरला पाठवली. ही नोटीस ट्विटरला २५ जून रोजी मिळाली.