बंगळुरु: वेदनांची जाणीव देण्याचे काम करणाऱ्या मेंदूला स्वत:ला मात्र वेदना होत नाहीत, या वैद्यक शास्त्रातील तथ्याचा अद््भुत परिचय देणारी विरळा शस्त्रक्रिया बंगळुरु येथील शल्य विशारदांनी पार पाडली. विशेष म्हणजे ज्या महिलेवर ही अवघड शस्त्रक्रिया झाली, ती शस्त्रक्रिया सुरू असताना चक्क रवींद्र संगीत गात होती. सरिता (नाव बदलले आहे) या प. बंगालमधील बरद्वानच्या ३४ वर्षीय महिलेवर येथील सीता भटेजा रुग्णालयात हा प्रयोग करण्यात आला. मेंदूवर झालेल्या साडे तीन तासांच्या शस्त्रक्रियेच्या काळात तिच्या बाकीच्या क्षमता जागृत ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी ही अवघड शस्त्रक्रिया चालू असताना तिने आवडते रवींद्र संगीत गाण्यास प्रारंभ केला.
मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान ती गात होती रवींद्र संगीत
By admin | Published: June 25, 2015 12:56 AM