राधास्वामी सत्संग प्रमुखांना 3500 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 12:39 PM2019-10-10T12:39:36+5:302019-10-10T12:39:47+5:30
आरएचसी ही कंपनी सिंग बंधुची आहे. याप्रकरणी आरएचसी होल्डिंगच्या तिसऱ्या पक्षातील हे 55 देणेकरी व्यक्ती
नवी दिल्ली - रॅनबेक्सी कंपनीचे संचालक मलविंदर आणि शिविंदर सिंग यांच्याविरुद्ध जपानी औषध कंपनी 'दायची सांक्यों'च्या बाजुने दिल्लीउच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यानुसार, 3500 कोटी रुपयांच्या डिक्रीसंबंधितील प्रकरणात राधा स्वामी सत्संगचे प्रमुख गुरिंदर सिंह ढिल्लो यांच्यासमवेत तिसऱ्या पक्षाच्या 55 लोकांना न्यायालयात पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आरएचसी होल्डींग कंपनीसंदर्भातील रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आरएचसी ही कंपनी सिंग बंधुची आहे. याप्रकरणी आरएचसी होल्डिंगच्या तिसऱ्या पक्षातील हे 55 देणेकरी व्यक्ती आणि कंपन्यांची रक्कम 30 दिवसांत उच्च न्यायालयातील संबंधित कार्यालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रॅनबॅक्सी लॅबोरेटरीच्या अधिग्रहणानंतर उफाळलेल्या वादासंदर्भात न्यायालयाने सिंग बंधुविरुद्ध निकाल दिला. त्यानुसार, सिंग बंधुंना जापानी कंपनी दाईची सांक्योला 3500 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले. या आदेशाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाने याबाबात सिंग बंधुच्या कंपनीतली देणेकरांना त्यांची देणी न्यायालयात जमा करण्याचंही आदेशात म्हटलं आहे.