नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीनंतर रायबरेली येथील नागरिकांचे आभार मानण्यासाठी दाखल झालेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि युपीए प्रमुख सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचे हेलिकॉप्टर उडविण्यास पायलटने नकार दिला. त्यामुळे सोनिया आणि प्रियंका यांना रायबरेली येथील गेस्ट हाऊसमध्ये थांबावे लागले.
हेलिकॉप्टर न उडविण्यासाठी पायलटने खराब हवामान असल्याचे कारण सांगितले. बुधवारी सोनिया आणि प्रियंका दिल्लीत दाखल होणार होत्या. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला उत्तर प्रदेशातील ८० पैकी केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. या विजयानंतर सोनिया रायबरेली येथील मतदारांचे आभार मानण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी जनतेचे आभार मानताना मोदी सरकारवर देखील निशाना साधला. त्या म्हणाल्या की, सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने मर्यादेचे उल्लंघन केली. ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत देखील सोनिया यांनी व्यक्त केली.
रायबरेली दौऱ्यात प्रियंका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधली. तर सोनिया गांधी यांनी मतदारांचे आभार मानले. तर काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या अमेठीत राहुल गांधी यांना पराभव पत्करावा लागला आहे. राहुल गांधी वायनाड मतदार संघातून विजयी झाले आहेत.