शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

रेल्वेच्या शौचालयातून पडलेली सोनसाखळी शोधली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:41 AM

रेल्वेने मनात आणले तर त्यांचे प्रशासन कोणत्या थराला जाऊन आणि किती तत्परतेने काम करू शकते याचा सुखद अनुभव महाराष्ट्रातील एका प्रवाशाला काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवले रेल्वे स्थानकावर आला.

नवी दिल्ली : रेल्वेने मनात आणले तर त्यांचे प्रशासन कोणत्या थराला जाऊन आणि किती तत्परतेने काम करू शकते याचा सुखद अनुभव महाराष्ट्रातील एका प्रवाशाला काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवले रेल्वे स्थानकावर आला.धावत्या रेल्वेगाडीच्या शौचालयातून पडलेली गळयातील सोन्याची चेन येवल्याचे स्टेशन मास्तर अनिल कुमार शर्मा यांनी तीन दिवसांनी शोधून परत केली तेव्हा या प्रवाशाला आश्चर्याचा धक्का बसला.हाडाचे डॉक्टर असलेले डॉ. चव्हाण-पाटील १६ जुलै रोजी ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ने लोणंदहून मनमाडला चालले होते. गाडी येवले येथे आली तेव्हा डॉ.पाटील शर्ट बदलण्यासाठी शौचालयात गेले. त्यांनी शर्ट काढला तेव्हा त्यासोबत त्यांच्या गळ््यातील सोन्याची चेन निघाली व खाली शौचालयात पडली.एव्हाना गाडी स्टेशनच्या बाहेर पडली होती. ५० ग्रॅम वजनाची दीड लाख रुपयांची चेन गेल्याने डॉ. पाटील यांनी साखळी ओढून गाडी थांबविली. गाडीचा गार्ड कोणी साखळी ओढली हे शोधत आला. डॉ. पाटील यांनी आपण साखळी ओढल्याचे सांगून कारण सांगितले. प्रकरण येवल्याचे स्टेशन मास्तर शर्मा यांच्यापर्यंत गेले.थोडा वेळ काय करता येईल याच्यावर विचार झाला व शेवटी रेल्वे कर्मचाºयांनी डॉ. पाटील यांना सांगितले की, गाडीला ‘बायो टॉयलेट’ असल्याने येथे काहीच करता येणार नाही. गाडी कोल्हापूरला जाईल तेव्हा तेथील सफाई कर्मचारीच त्या ‘बायो टॉयलेट’ची टाकी सफाईसाठी उघडतील. त्यामुळे कोल्हापूरला गेलात तर तेथे चेन शोधता येईल.डॉ. पाटील यांनी चेनचा नाद सोडला व ते येवल्याहून सहा तासांचा प्रवास करून फलटणला घरी गेले. घरी घडला प्रकार सांगितल्यावर त्यांच्या ‘टेकसॅवी’ मुलीने प्रकरण हाती घेतले. १८ जुलै रोजी त्यांच्या मुलीने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना टिष्ट्वट केले व मदतीची विनंती केली. अवघ्या १० मिनिटांत रेल्वेमंत्र्यांनी उत्तराचे टिष्ट्वट केले,‘ संबंधितांना आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.’!त्यानंतर अर्ध्या तासात डॉ. पाटील यांना पुणे रेल्वे स्टेशन मास्तरचा फोन आला व त्यांनी चेन कुठे, कशी पडली याची माहिती घेतली. त्यांनी सांगितल्यानुसार डॉ. पाटील दुसºया दिवशी कोल्हापूरला गेले. पण तेथे त्यांना असे कळले की त्या गाडीला ‘बायो टॉयलेट’ नव्हते तर साधा भारतीय पद्धतीचा शौच होता. म्हणजे पडलेली चेन त्या शौचालयाच्या आरपार खाली जाऊन रुळांमध्ये पडली असणार .ही माहिती येवले येथे स्टेशन मास्तर शर्मा यांना कळविली गेली. शर्मा यांनी कर्मचाºयांना बरोबर घेऊन पाऊस पडत असूनही सुमारे दोन किमी अंतराच्या रेल्वेरुळांमध्ये कसून शोध घेतला. अखेर रुळांमधील खडीतील घाणीतून चेन दिसल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.