राफेल करार : राहुल गांधींचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 23:16 IST2018-02-09T23:13:28+5:302018-02-09T23:16:12+5:30

राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपा नेत्यांमधील जुगलबंदी सध्या चांगलीच रंगली आहे.  राफेल कराराप्रकरणी राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना वित्तमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले होते.

Rafael Agreement: Rahul Gandhi's Face Against Modi Government | राफेल करार : राहुल गांधींचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा  

राफेल करार : राहुल गांधींचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा  

नवी दिल्ली -  राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपा नेत्यांमधील जुगलबंदी सध्या चांगलीच रंगली आहे.  राफेल कराराप्रकरणी राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना वित्तमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी तीन वेगवेगळे ट्विट करून यूपीए सरकारच्या कार्यकाळात खासदारांनी संरक्षण करारांविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शेअर केली आहे. राहुल गांधी यांनी जेटलींना विचारले की, त्यांनी देशाला सांगावे की राफेल फायटर विमाने किती किमतीला खरेदी केली जात आहेत. 
 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केल्यानंतर भाजपाने राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. याप्रकरणी संरक्षण मंत्रालयाने पत्रक प्रसिद्ध केल्यानंतर गुरुवारी वित्तमंत्री अरुण जेटली यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला. अशा प्रकारचे आरोप करून तुम्ही देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवत आहात. याबाबत राहुल गांधी यांनी माजी संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जींच्या आचरणातून काही शिकण्याची गजर आहे, असा टोलाही जेटली यांनी लगावला होता. 
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावर टीका करताना, मोदी यांनी आधी राफेल लढाऊ विमानांच्या किंमती जाहीर करा, अशी मागणी केली होती.  मोदी लोकसभेत तब्बल दीड तास बोलत होते. पण संपूर्ण भाषणात त्यांनी राफेल विमाने भारताने केवढ्याला विकत घेतली, याचे उत्तर दिले नाही. देशातील शेतकºयांच्या स्थितीवर त्यांनी शब्द उच्चारला नाही आणि तरुणांना रोजगार देण्याच्या आश्वासनाबद्दलही ते काहीच बोलले नाही.
 

Web Title: Rafael Agreement: Rahul Gandhi's Face Against Modi Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.