शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

राफेल करार : राहुल गांधींचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 11:13 PM

राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपा नेत्यांमधील जुगलबंदी सध्या चांगलीच रंगली आहे.  राफेल कराराप्रकरणी राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना वित्तमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले होते.

नवी दिल्ली -  राफेल विमान करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपा नेत्यांमधील जुगलबंदी सध्या चांगलीच रंगली आहे.  राफेल कराराप्रकरणी राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना वित्तमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी तीन वेगवेगळे ट्विट करून यूपीए सरकारच्या कार्यकाळात खासदारांनी संरक्षण करारांविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शेअर केली आहे. राहुल गांधी यांनी जेटलींना विचारले की, त्यांनी देशाला सांगावे की राफेल फायटर विमाने किती किमतीला खरेदी केली जात आहेत.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य केल्यानंतर भाजपाने राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. याप्रकरणी संरक्षण मंत्रालयाने पत्रक प्रसिद्ध केल्यानंतर गुरुवारी वित्तमंत्री अरुण जेटली यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला. अशा प्रकारचे आरोप करून तुम्ही देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवत आहात. याबाबत राहुल गांधी यांनी माजी संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जींच्या आचरणातून काही शिकण्याची गजर आहे, असा टोलाही जेटली यांनी लगावला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावर टीका करताना, मोदी यांनी आधी राफेल लढाऊ विमानांच्या किंमती जाहीर करा, अशी मागणी केली होती.  मोदी लोकसभेत तब्बल दीड तास बोलत होते. पण संपूर्ण भाषणात त्यांनी राफेल विमाने भारताने केवढ्याला विकत घेतली, याचे उत्तर दिले नाही. देशातील शेतकºयांच्या स्थितीवर त्यांनी शब्द उच्चारला नाही आणि तरुणांना रोजगार देण्याच्या आश्वासनाबद्दलही ते काहीच बोलले नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीArun Jaitleyअरूण जेटली