नवी दिल्ली- तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी राफेल करारावरून मोदींवर निशाणा साधला आहे. भाजपाला राफेल करारावर बोलण्यासाठी राज्यसभेचा सदस्य सापडला. लोकसभेत 300 खासदार असूनही राज्यसभेतला माणूस इथे येऊन मोदी सरकारची बाजू मांडत आहे. विशेष म्हणजे राज्यसभेचे सदस्य असलेले अरुण जेटली हे संरक्षण मंत्रीदेखील नाहीत. तरीही स्वतःला ते राफेल करारातील तज्ज्ञ समजतात.आमच्या पक्षाला जेटलींसारखं तूतू-मैं मैंमध्ये अडकून पडायचं नाही. खरं तर नरेंद्र मोदी हे रामायण काळातील मेघनाद आहेत. त्यामुळेच ते अरुण जेटलींच्या मागे लपत आहेत. नरेंद्र मोदींनी संसदेचा सामना करण्याची हिंमत दाखवावी, जेपीसी गठीत करून संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या राफेल कराराची चौकशी केली पाहिजे.
'नरेंद्र मोदी हे 'मेघनाद'; अरुण जेटलींच्या मागे लपत आहेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 5:17 PM
तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी राफेल करारावरून मोदींवर निशाणा साधला आहे.
ठळक मुद्दे तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत राय यांनी राफेल करारावरून मोदींवर निशाणा साधलाभाजपाला राफेल करारावर बोलण्यासाठी राज्यसभेचा सदस्य सापडला. नरेंद्र मोदी हे रामायण काळातील मेघनाद आहेत.