नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल प्रकरणाबाबत मोदींची कथित स्वरूपात पाठराखण करण्याचा प्रयत्न समोर आला असतानाच राष्ट्रवादी पक्षानं पवारांच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच शरद पवारांनीराफेल करारावरून पंतप्रधान मोदींना क्लीन चिट दिली नसल्याचंही राष्ट्रवादीनं सांगितलं आहे.विशेष म्हणजे काल पवारांनी मोदींच्या हेतूवर जनतेला संशय नसल्याचं सांगितल होतं आणि आता पक्षानं ही वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारनं लढाऊ विमानं असलेल्या राफेलच्या खरेदी किमतीबाबत खुलासा करावा आणि या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती(जेपीसी)मार्फत चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. तसेच मीडियानं पवारांच्या विधानाचा विपर्यास केल्याचंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
Rafale Deal Contoversy: पवारांनी मोदींना क्लीन चिट दिली नाही; राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 8:51 AM