शीलेश शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आलोक वर्मांना घरी बसवल्यानंतर त्यांच्या कार्यालयातील राफेल गैरव्यवहाराचे पुरावे नष्ट करून त्यांची रूम सील करण्यात आली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.ते म्हणाले, राफेलप्रकरणी सीबीआयने चौकशी सुरू केली तर आपल्याला राजीनामा द्यावा लागेल हे मोदींना पक्के ठाऊक आहे. वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविणे हे बेकायदा आहे. असा निर्णय घेण्याचा अधिकार कायद्याने पंतप्रधानांना नाही. सरन्यायाधीश व लोकसभेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याशी चर्चा करून असा निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र मोदींनी असे काही केले नाही.
राफेलचे पुरावे नष्ट केले - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 6:14 AM