- शीलेश शर्मा ।नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जणू पक्षकार्यातून लक्ष काढले असून, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.राज्यांसाठी १३ सरचिटणीस व ७ प्रभारी काम पाहतात. राहुल यांनी गुरूदास कामत व दिग्विजय सिंग यांना दूर करून, राजस्थानासाठी अविनाश पांडे व कर्नाटकात के. सी. वेणुगोपाल यांना नेमले. त्यानंतर पी. एल. पुनिया, आर. पी. एन. सिंह, आर. सी. खुंटिया, चेल्लाकुमार, गिरीश चोंडकर यांचीही विविध प्रभारी म्हणून नियुक्ती केली. महाराष्ट्रात काँग्रेस सेवा दलाच्या अध्यक्षपदावरून चंद्रकांत दायमा यांना हटवून केशवराव औताडे यांना नेमले.दिग्विजय सिंग, कमलनाथ व ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशचे प्रभारी मोहन प्रकाशना दूर करा, अशी मागणी केल्यावर राहुल गांधी यांनी तेथे दीपक बाबरिया यांना नेमले.सुश्मिता देव महिला काँग्रेसच्या अध्यक्ष- महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शोभा ओझा यांना राहुल यांनी दूर करून सुश्मिता देव यांची नियुक्ती केली आहे. त्यांना लोकमतच्या बेस्ट पार्लमेंटरियन अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.- मोहन प्रकाश यांच्याकडून महाराष्ट्राची जबाबदारीही काढून घेतली जाईल, असे दिसते. त्यांच्याबरोबरच अनेक जुने चेहरे लवकरच दिसेनासे होतील
अध्यक्ष न होताच आली राहुलकडे काँग्रेसची सूत्रे; सोनिया गांधींनी काढले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:20 AM